Land Records Pudhari
पुणे

Pune Land Records Office Division: पुणे भूमी अभिलेख विभागाचे उत्तर-दक्षिण विभाजन; दोन नवी नगर भूमापन कार्यालये

पुणे जिल्ह्यात वाढत्या नागरीकरणामुळे भूमी अभिलेख विभागाचे उत्तर व दक्षिण पुणे असे विभाजन करण्यात आले असून दोन नवीन नगर भूमापन कार्यालयांना मान्यता मिळाली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्यात वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे जमीनमोजणीसह अन्य कामांचा ताण भूमी अभिलेख विभागाकडे वाढला आहे. त्यामुळे कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत होते. यासर्व पार्श्वभूमीवर महसूल विभागाने पुणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे विभाजन करून उत्तर पुणे व दक्षिण पुणे, अशी दोन कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुणे शहरासाठी आणखी दोन नगर भूमापन कार्यालये सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख उत्तर पुणे या कार्यालयाचे कार्यक्षेत्र खेड, मावळ, शिरूर, मुळशी, नगर भूमापन अधिकारी पिंपरी-चिंचवड, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 3 असे असणार आहे.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दक्षिण पुणे या कार्यालयाचे कार्यक्षेत्र बारामती, दौंड, पुरंदर, भोर, राजगड, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 2, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 4.

हवेली तालुका आणि पुणे शहर या भूमी अभिलेख कार्यालयाची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार आता आणखी दोन नगर भूमापन कार्यालये स्थापन केली आहेत. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी क्रमांक 3 आणि नगर भूमापन अधिकारी क्रमांक 4 अशी कार्यालये असणार आहेत.

नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 या कार्यालयाच्या हद्दीत एकूण मिळकती 33 हजार 8 इतक्या असणार आहेत, तर नगर भूमापन अधिकारी क्रमांक 3 मध्ये एकूण मिळकती 65 हजार 237 इतक्या असणार आहेत. नगर भूमापन अधिकारी क्रमांक 2 मध्ये एकूण मिळकती 40 हजार 100, तर नगर भूमापन अधिकारी क्रमांक 4 या कार्यालयाच्या हद्दीत 80 हजार 693 इतक्या मिळकतींचा समावेश असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT