Pune Attack Viral Video Crime News in Marathi
अशोक मोराळे, पुणे
पुण्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत. एका तरुणावर पाठलाग करून कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. लाकूड तोडण्यासाठी आपण जसे घाव घालतो तसे घाव या तरुणावर घालण्यात येत होते. तो वाचण्यासाठी त्याच्या पाया पडत गयावया करत होता. बघ्याची मोठी गर्दी होती मात्र कोणी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला नाही.
आदित्य सुनिल कांबळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मारहाणीत त्याच्या डोक्यात 30 पेक्षा अधिक टाके पडल्याची माहिती आहे. खुनी हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध मैत्रिणीस तक्रार देण्यास भाग पाडले म्हणून आदित्य याच्यावर हा कोणी हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान एवढा गंभीर प्रकार असताना देखील पोलिसांनी अद्याप याबाबत कोणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे. याबाबत केवळ इच्छापूर्वक हत्याराने जबर दुखापत करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला.