पुणे

Pune : मुंढव्यात किचनला आग; आईसह मुलगा जखमी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात उंड्री, बी. टी. कवडे रस्ता आणि मुंढवा या तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंढव्यातील बंगल्यामधील किचनला लागलेल्या आगीत आई आणि मुलगा जखमी झाले आहेत. पहिली घटना उंड्रीतील होलेवस्तीमधील पत्र्याच्या शेडमध्ये एम. के. स्क्रॅप सेंटर असून, येथील भंगारमालाच्या साठ्याला आग लागली होती. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मुंढव्यामधील एका बंगल्याच्या किचनमध्ये लागलेल्या आगीत आई आणि मुलगा जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. या आगीत अंजली ईश्वर सकत (वय 58), जतिन ईश्वर सकत (वय 32) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे.

मुंढवा रस्त्यावरील झगडे पार्कमधील संकल्प बंगलोमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कशाला मिळाली. यानंतर कालकथित दयानंद सोनकांबळे अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर वरील घरात, किचनमध्ये एलपीजी.सिलिंडर पेटला होता. तसेच, किचनमधील लाकडी फर्निचर पेटले होते. अग्निशमनने सिलिंडरला लागलेली आणि किचनमधील आग विझवली. या घटनेत घरातील अंजली सकत यांचा उजवा हात, पाय आणि जतिन सकत याचा उजवा हात, पाय भाजले असून, या दोन्ही जखमींना दलाच्या जवानांनी खासगी दवाखान्यात पाठविले आहे.

ही कामगिरी अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, तांडेल रणदिवे, फायरमन जगताप, बिचकुले, कवडे, कांबळे यांनी तसेच हडपसर अग्निशमन केंद्राकडील तांडेल, शौकत शेख यांनी केली. दुसरी घटना बी. टी. कवडे रस्त्यावरील सोलेश पार्क सोसायटीमधील आवारात असणार्‍या महावितरणच्या 200 केव्ही पॅनल बोर्ड व शेजारीच असणार्‍या दोन डीपीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवत धोका दूर केला.

गोडावूनमधील भंगार खाक

उंड्रीतील होलेवस्तीमधील पत्र्याच्या शेडमधील एम. के. स्क्रॅप सेंटरमध्ये भंगारमालाच्या साठ्याला लाग लागल्याची माहिती सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कशाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वतीने गांभीर्य लक्षात घेऊन कोंढव्यातील अग्निशमन दलाचे 2 बंब आणि 1 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले होते. पत्र्याचे शेड असलेल्या गोडाऊनला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून 25 मिनिटांत आग आटोक्यात आणली. गोडाऊनमधील सगळे भंगार जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आली. अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांच्यासह 10 जवानांनी आग आटोक्यात आणली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT