Mango File Photo
पुणे

Pune Kesar Mango Demand: पुण्यात केशर आंब्याची मागणी वाढली; हापूसला पर्याय ठरत आहे

फसवणूक व जास्त दरांमुळे ग्राहकांचा कल बदलला; मार्केट यार्डात दररोज 700-800 क्रेट्सची आवक

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: कोकणच्या हापूस आंब्याच्या नावाखाली होणारी फसवणूक, जास्त पैसे मोजूनही अपेक्षित दर्जा न मिळणे आणि कमी टिकवणक्षमता या कारणांमुळे पुणेकर आता गोड, परवडणारा आणि टिकाऊ पर्याय म्हणून केशर आंब्याला पसंती देतआहेत. मराठवाडा आणि विदर्भातून येणाऱ्या केशरची बाजारातील आवक आणि मागणी दोन्ही झपाट्याने वाढत आहे. परिणामी, केशर आंब्याचा गुलटेकडी मार्केट यार्डात झपाट्याने दबदबा वाढताना दिसत आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डात मराठवाडा आणि विदर्भातून दररोज सुमारे 700 ते 800 क्रेट्‌‍स केशर आंब्याची आवक होत आहे. यामध्ये मराठवाड्यातील आवक सर्वाधिक असून, घाऊक बाजारात या आंब्याला किलोमागे 60 ते 100 रुपये दर मिळत आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला हा हंगाम मेच्या मध्यापर्यंत राहील. त्यानंतर गुजरातमधून मोठ्या प्रमाणात केशर दाखल होईल. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील आंबाही बाजारात येण्यास सुरुवात होईल. सध्याचे बाजारातील चित्र पाहता एकेकाळी हापूसवर अवलंबून असलेली बाजारपेठ आता केशरकडेही झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे.

गुजरातचे वर्चस्व मोडीत निघणार?

मागील पंधरा वर्षांत विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लागवड झाली. त्यामुळे उत्पादनासह बाजारातील आवक वाढली. काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये हंगाम सुरू झाल्यानंतर मे महिन्यात दिसणारा केशर आता एप्रिलपासूनच दिसत आहे. गुजरातच्या तुलनेत मराठवाड्यातील आंब्याची आवक आणि दर चांगले मिळत आहेत. त्यात गुजरातहून येणाऱ्या आंब्याच्या वाहतूकखर्चात वाढ झाल्याने त्याचे दरही वाढत असल्याने येत्या काळात केशरच्या गुजरातचे वर्चस्व मोडीत निघू शकते.

हापूस आंब्याच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि दर्जाबाबतच्या तक्रारी वाढल्याने ग््रााहकांचा कल केशरकडे स्पष्टपणे वळताना दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भातून येणारा केशर आंबा गोड, टिकाऊ आणि तुलनेने परवडणारा असल्याने पुणेकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दररोजच्या आवकमध्ये वाढ होत असून, पुढील काळात केशरचा बाजारातील हिस्सा आणखी वाढेल.
रोहन उरसळ, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT