Recruitment Pudhari
पुणे

Pune ITI Job Fair: आयटीआयमध्ये रोजगार मेळावे; पुणे जिल्ह्यातील युवकांना नोकरीची संधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांत नामांकित कंपन्यांचा सहभाग; विविध पात्रतेच्या उमेदवारांसाठी भरती

पुढारी वृत्तसेवा

मंचर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

अल्पकालीन रोजगार कार्यक्रम (शॉर्ट टर्म एम्प्लॉयमेंट प्रोग््रााम) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी, तसेच इतर बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

रोजगार मेळाव्यांचे वेळापत्रक:

सोमवारी (दि. 20) वीर फिरंगोजी नरसाळा शासकीय आयटीआय, वरवंड (ता. दौंड), मंगळवार (दि. 21) मालोजीराजे भोसले शासकीय आयटीआय, इंदापूर, बुधवारी (दि. 22) छत्रपती शिवाजी महाराज शासकीय आयटीआय, औंध, पुणे, गुरुवारी (दि. 23) शहीद राजगुरू शासकीय आयटीआय, खेड (राजगुरुनगर), सोमवारी (दि. 27) तात्या टोपे शासकीय आयटीआय, शिरूर.

या रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. यात फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि., विशे कॉम्पोनंट्‌‍स इंडिया प्रा. लि., कुबेर कॉर्पोरेट, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लि., युनो मिंडा लि., ॲडको इंडिया, साई सिद्धी कॉर्पोरेशन, श्री होम अप्लायन्सेस अँड सर्व्हिसेस प्रा. लि. आदी कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

मेळाव्यातील नोकरीच्या संधी एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांसाठी खुल्या आहेत. विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481 रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा 020-26133606 या क्रमांकावर संपर्क करावा. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना करिअरची दिशा मिळणार असून, ही संधी साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT