Wife Killed Pune Pudhari
पुणे

Wife Killed Pune: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; पतीला पोलिसांकडून अटक

बिबवेवाडीतील धक्कादायक घटना; मारहाण व चाकू हल्ल्यात महिलेचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

पुणे : चारित्र्याच्या संशयातून पतीने बेदम मारहाण करून पत्नीचा खून केला. ही घटना अंबिकानगर अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी परिसरात मंगळवारी (दि. 24) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सारिका शुभम घोडके (वय 23, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती शुभम श्रीकांत घोडके (वय 29) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सारिकाची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (वय 50, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी पती शुभम हा अप्पर इंदिरनगर परिसरातील अंबिकानगर भागात राहायला आहे. तो पानटपरी चालवतो, तर सारिका ही एका ब्युटीपार्लरमध्ये काम करत होती. दोघांना दोन मुले आहेत. शुभम हा पत्नी सारिकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करायचा. 24 मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास शुभमने सारिकाला मारहाण करत तिच्यावर चाकूने वार केले.

यात ती गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कठीण वस्तूने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पसार झालेला पती शुभमला पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT