Raigad Heatwave Pudhari
पुणे

Pune Heatwave April Temperature: पुण्यात उष्णतेची लाट तीव्र; तापमान 42 अंशांवर

18 एप्रिलपर्यंत उष्णतेचा कहर कायम; दुपारी बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात गत तीन दिवसांपासून उष्णतेची प्रखर लाट तीव झाली असून, दुपारी 12 ते 4 पर्यंत उन्हात फिरताना काळजी घ्या, असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. गत तीस वर्षांत एप्रिलमध्ये शहराचे तापमान 42 पेक्षा जास्त आजवर फक्त पाच वेळा गेले आहे. 30 एप्रिल 1897 रोजी 43.3 अंश सेल्सिअस तापमानाचा विक्रम अजून कायम आहे.

राज्यात सर्वत्र उष्णतेची अतितीव लाट सक्रिय झाली असून, पुणे जिल्ह्यासह शहरात देखील ही लाट आहे. रविवार 12 एप्रिल रोजी शहराचे तापमान यंदा एप्रिलमध्ये प्रथमच 40 अंशावर गेले, तर 13 रोजी 41 आणि 14 रोजी 42 अंशावर गेले. मंगळवारी दिवसभर सूर्य जणू आग ओकत होता. प्रचंड उष्मा तयार झाल्याने चाकरमानी वर्गाला घामाच्या धारा लागल्या होत्या.

मंगळवारचे शहराचे कमाल तापमान

लोहगाव 42, शिवाजीनगर 40, पाषाण 40, लवळे 40, चिंचवड 40, मगरपट्टा 40, एनडीए 38, कोरेगाव पार्क 40

18 एप्रिलपर्यंत तीव उष्णतेची लाट...

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहराचे कमाल तापमान 40 अंशावर 18 एप्रिलपर्यंत राहणार आहे. 19 एप्रिलपासून ही लाट किंचित कमी म्हणजे पारा 38 अंशावर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT