Pomegranate Pudhari
पुणे

Pune Pomegranate Market Prices: गुलटेकडी मार्केट यार्डात डाळिंबाची आवक निम्म्यावर; भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ

हंगाम संपल्याने आवक घटली; गणेशोत्सवामुळे मागणी वाढल्याने घाऊक बाजारात डाळिंबाला किलोला १० ते ३०० रुपयांचा भाव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जूनच्या टप्प्यातील डाळींबाचा हंगाम संपल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची आवक निम्म्यावर आली आहे. मागील आठवड्यात होणारी १२० ते १४० टनांची आवक रविवारी (दि. ३०) ७० ते ८० टनांवर आली.

गणेशोत्सवामुळे डाळिंबाला चांगली मागणी आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने भावात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी घाऊक बाजारात डाळिंबाच्या किलोला दहा ते तीनशे रुपयांचा दर मिळाला. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने त्यांचे दर टिकून आहेत.

गुलटेकडी येथील मार्केटयार्ड येथील फळबाजारात रविवारी लिंबू ६०० ते ७०० गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्रा ३० ते ३५ टन, डाळींब ७० ते ८० टन, पपई १५ ते २० टेम्पो, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिक्कू १००० डाग, पेरु ५०० ते ६०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ २० ते ३० टन, सफरचंद पाच ते साडे पाच हजार बॉक्स आणि अननसाची ६ ट्रक इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ६०० ते ३०००, मोसंबी : (३ डझन) : १००-२४० (४ डझन) : २०-११०, संत्रा : (१० किलो) : २००-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ८०-३००, आरक्ता : १०-५०, गणेश : १०-३०, कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : १०-३०, चिक्कू (दहा किलो) : ६००-७००

पेरू (२० किलो) : ५००-८००, अननस (१ डझन) : ३००-९००, सीताफळ (१ किलो) : २०-१५०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००. सफरचंद - रॉयल गाला (१४ किलो) २७००-२८००, काश्मीर डेलिशिअस (१४ ते १६ किलो) १३००-१६००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT