Pulses Pudhari
पुणे

Pune Grocery Market: पुण्यात किराणा बाजारात मंदी; साबुदाणा-भगरीच्या दरात तेजी, तूरडाळ स्वस्त

सण-उत्सवांचा अभाव आणि कमी मागणीमुळे बहुतांश किराणा वस्तूंचे दर स्थिर; उत्पादन घटण्याच्या शक्यतेने साबुदाणा व भगरी महागली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उन्हाळी सुटीनंतर परगावी गेलेले नागरिक पुण्यात परतू लागले असले, तरीही किराणा व अन्नधान्य बाजारातील मागणीत अद्याप अपेक्षित वाढ झालेली नाही. सध्या कोणताही मोठा सण-उत्सव नसल्याने पुण्यातील मार्केट यार्डच्या भुसार बाजारात व्यवहार तुलनेने मंदावलेले आहेत. परिणामी, बहुतांश अन्नधान्य आणि किराणा वस्तूंचे दर स्थिर राहिले आहेत.

डिझेल दरवाढीचा परिणाम अद्याप मालवाहतूक खर्चावर आणि वस्तूंच्या किरकोळ दरांवर दिसून आलेला नाही. मात्र, पुढील काही आठवड्यांत त्याचा परिणाम विविध वस्तूंच्या भावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, साबूदाणा आणि भगरीच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात तेजी कायम आहे. यंदा या दोन्ही वस्तूंचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, बाजारातील मागणी वाढल्याने त्यांच्या दरात किलोमागे सुमारे ५ रुपयांची वाढ झाली आहे. उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंना वर्षभर मागणी असते. त्यातच उपलब्धता कमी राहण्याच्या अंदाजामुळे व्यापाऱ्यांकडूनही खरेदी वाढल्याचे सांगितले जात आहे.

याउलट तूरडाळीच्या दरात किलोमागे २ रुपयांची घट झाली आहे. बाजारात पुरेसा साठा उपलब्ध असून, मागणी तुलनेने कमी असल्याने दरातही घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या कोणतेही मोठे सण नसल्यामुळे साखर आणि गुळाच्या विक्रीतही मंदी आहे. मागणी कमी असल्याने या दोन्ही वस्तूंचे भाव स्थिर आहेत. शेंगदाणे, गोटा खोबरे, बेसन, विविध प्रकारच्या डाळी, खाद्यतेले आणि नारळ यांच्या दरातही विशेष बदल झालेला नाही.

बाजारभाव पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) ४१५०-४२०० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २३००-३१००, सरकी तेल २१५०-२६००, सोयाबीन तेल २१५०-२६००, पामतेल २१५०-२४५०, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५००, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २०५०-२५५० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ३६५०-४२००, मसुरी ३१००-३५००, सोना मसूरी ४४००-७४००, एच.एम.टी. कोलम ५७००-६०००, लचकारी कोलम ६६००-७१००, चिन्नौर ६५००-७०००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४१५०-४४००, लोकवन नं. २ ३७००-३९००, नं.३ ३०७५-३६५०, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४४५०, मिलबर २८५०-२९०० रु. ज्वारी :- गावरान नं. १ ५७००-६५००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५१००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी :- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु. गूळ :- गूळ नं. १ ४०५०-४७५०, गूळ नं.२ ४४५०-४५५० गूळ नं.३ ४३००-४४००, बॉक्स ४४००-५४०० रु. डाळी :- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७३००-७५००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७५००-७६००, मटकीडाळ ८२००-८३००, उडीदडाळ १००००-१२००० रु.

कडधान्ये :-हरभरा ७०००-७५००, हुलगा ६१००-७०००, चवळी ७८००-९८००, मसूर ७५००-८२००, मूग ९२००-१२३००, मटकी गावरान १५०००-१६७००, मटकी पॉलिश ८७००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ७५००-७८००, मटकी सेलम १७५००-१८७००, वाटाणा हिरवा ५५००-५५००, वाटाणा पांढरा ५०००-५२००, काबुली चणा ७४००-१०८०० रु. साबूदाणा :-साबूदाणा नं.१ ७०००, साबूदाणा नं.२ ६५००, साबूदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-१५८००-१६०००, सावा भगर १४०००-१४२०० रु. गोटा खोबरे ३७०००-३९००० रु. शेंगदाणा :- जाडा ११०००-१२५००, स्पॅनिश–१२३००-१३८००, घुंगरू ११२००-१२७०० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदूर सुपर २५०००-३०००० रु. पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४९००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ५५०-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६००-१६५०, रवा १६५०-१७५०, मैदा १६५०-१७५०, बेसन:- (५० किलोस) ३९००-४६५० रु.मिरची: काश्मीरी ढब्बी ६००००-६५०००, ब्याडगी ३५०००-५००००, लवंगी तेजा २३०००-२५०००, गुंटूर २४०००-२६०००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव) : नवा पॅकिंग १७००-१८५०, मद्रास ४६००-४८००, पालकोल जुना २१००-२३०० रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT