Voting  Pudhari
पुणे

Pune Election Voting Leave: पदवीधर, शिक्षक मतदारांना २३ ऑक्टोबरला विशेष रजा; खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना दोन तासांची सवलत

मतदानासाठी भरपगारी सुटी; नियमित नैमित्तिक रजेव्यतिरिक्त मिळणार विशेष रजा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. ही रजा संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियमित नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ बनुसार मतदानासाठी भरपगारी सुटीची तरतूद केली आहे. त्यानुसार या निवडणुकीत मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी ही विशेष रजा लागू राहणार आहे.

मात्र, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारांना पूर्ण दिवसाची विशेष नैमित्तिक रजा लागू होणार नाही. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी याबाबतची माहिती दिली. मतदानाच्या दिवशी पात्र मतदारांना मतदान करता यावे, यासाठी संबंधित आस्थापनांनी आवश्यक सवलत द्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT