Ganesh Visarjan Miravnuk 2025 pudhari
पुणे

Pune Ganesh Visarjan 2025: पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन, किती तास चालली मिरवणूक?

Pune Ganpati Visarjan Miravnuk 2025: पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन पार पडले

अमृता चौगुले

Pune Ganesh Visarjan Miravnuk 2025

पुणे : पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन पार पडलं आहे. नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने विसर्जन झाले आहे. तर दुसरीकडे संध्याकाळी पावणे सातपर्यंत गरुड गणपती मंडळ, नवग्रह मंडळ, अखिल मंडई मंडळ यासंह अनेक मंडळे लक्ष्मी रस्त्यावर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु पुढे जाण्यासाठी जागाच मिळत नसल्याने आहे त्याच जागेवर उभे आहेत.

मानाच्या गणपतीचं विसर्जन किती वाजता झाले? (Pune Ganesh Visarjan 2025)

1. कसबा गणपती

मार्गस्थ : सकाळी 9.30 वाजता

विसर्जन : दुपारी 3.45 वाजता

मिरवणूक जवळपास 6 तास 15 मिनिटांपर्यंत चालली.

2. तांबडी जोगेशवरी मंडळ

मार्गस्थ : सकाळी 9.45 वाजता

विसर्जन : संध्याकाळी 4.10 वाजजता

मिरवणुकीला 6 तास 40 मिनिटे लागली

3. गुरुजी तालीम गणपती

मार्गस्थ : सकाळी 10 वाजता

विसर्जन : संध्याकाळी 4.35 वाजता

मिरवणूक जवळपास 7 तास 05 मिनिटे चालली

4. तुळशीबाग गणपती

मार्गस्थ : सकाळी 10.15 वाजता

विसर्जन : संध्याकाळी 4.59 वाजता

ही मिरवणूक 7 तास 29 मिनिटे चालली.

5. केसरीवाडा गणपती

मार्गस्थ : सकाळी 10.30 वाजता

विसर्जन : संध्याकाळी 5.39 वाजता

ही विसर्जन मिरवणूक 8 तास 09 मिनिटे चालली.

मानाच्या गणपतींचं विसर्जन कुठे करण्यात येते?

मानाच्या पहिल्या तीन गणपतीचे विसर्जन नटेश्वर घाट इथे पार पडले तर उरलेल्या दोन गणपतींचे विसर्जन पांचाळेश्वर घाट येथे पार पडले.

गतवर्षीच्या तुलनेत एक ते दोन तास आधी मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले असले तरी नियोजित वेळेपेक्षा एक तास विलंबाने मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक पार पडली.

डीजेचा दणदणाट

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट शुक्रवारीही दिसून आला. डीजेच्या कानठिळ्या बसवणाऱ्या आवाजांमुळे परिसर हादरून गेला.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब गणपती मिरवणुकीला संध्याकाळी सुरुवात झाली. उद्योजक आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते आरती करून मिरवणूक सुरु झाली. दोन ढोल ताशा पथक आणि दिलेल्या वेळेत ही मिरवणूक हॊणार आहे

पुढच्या पाच ते सहा वर्षात पुण्यातील गणेश उत्सव डीजे मुक्त होईल अशी आशा आहे. यावर्षी आमच्या मिरवणुकीमध्ये दोन नामवंत ढोल ताशा पथक वादन होईल. मागील दहा दिवसात अतिशय धार्मिक पद्धतीने उत्सव पार पडला त्याचा खूप आंनद आहे. पोलिसांनी दिलेल्ल्या वेळात आमचं मंडळाचं विसर्जेन होईल.
पुनीत बालन, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

बेलबाग चौकात कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद

बेलबाग चौकात अखिल मंडई मंडळाचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. गणपती मंडळे वेळेत पुढे सरकत नसल्याने आणि काही मंडळांनी घुसखोरी केल्याने मंडई मंडळाचे कार्यकर्ते संतापले. यानंतर काही वेळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात वाद झाला होता.

अजित पवारांचं ढोलवादन

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात गणेशोत्सवात ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

संध्याकाळी पाचपर्यंत कुमठेकर रस्त्यावर मंडळ धीम्या गतीने

कुमठेकर रस्त्यावर मंडळ अतिशय धीम्या गतीने जात होते. गर्दीही फारशी नाही. दोन मंडळामध्ये बरेच अंतर पाहायला मिळत असून संध्याकाळी साडेपाचपर्यंत फडतरे चौकातून फक्त चार मंडळे मार्गस्थ झाले होते.

रात्री आठ वाजेपर्यंतची मंडळांची स्थिती काय?

रात्रीचे आठ वाजले तरी मंडई मंडळाचा गणपती जागेवरच होता. पोलिसांनी दिलेल्या वेळेनुसार सात वाजता मंडई मंडळाचा गणपती हवा होता. मात्र अखिल मंडई मंडळाचा गणपती अजूनही जागेवरच होता. शेवटी पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. मात्र, यामुळे पुण्यातील गणपती विसर्जनाचे वेळापत्रक विस्कटणार, असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT