Pune Ganeshotsav Horror Exhibits Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Horror Exhibits: पुण्यात गणेशोत्सवात हॉरर देखाव्यांची धूम; चार किलोमीटरपर्यंत रांगा

‘तुंबाड’, ‘हॉरर जंगल’, ‘शंभाला’ ठरले आकर्षण; भुतांचे आवाज, अंधार अन् लेझर-होलोग्रामच्या थरारासाठी सहकुटुंब गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाही भव्य, आकर्षक आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित देखावे उभारले आहेत. यामध्ये धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांसोबतच भयपट, रहस्य आणि थराराचा अनुभव देणाऱ्या देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हॉरर देखाव्यांची बच्चेकंपनीत अधिक आकर्षण आहे. त्यामुळे सहकुटुंब रांगा लावून हे देखावे पाहिले जात आहेत.

बुधवार पेठेतील जिजामाता तरुण मंडळाने 'तुंबाड' या गूढ आणि भयपटावर आधारित देखावा साकारला आहे. भयपटातील वातावरणाची अनुभूती देण्यासाठी सजावट आणि जिवंत दृश्यांचा वापर करण्यात आला आहे.

उदय मंडळ ट्रस्टच्या 'हॉरर जंगल' या देखाव्यात जंगल, अंधार आणि भयपटाचा अनुभव देणारी मांडणी करण्यात आली आहे. तसेच के. के.मार्केटसमोर दररोज दोन किलोमीटरची रांग दिसून येत आहे. भूतांचे आवाज पाहून मुले घाबरून जात आहेत. तरीही हे देखावे चर्चेचा विषय ठरत आहेत.

देखावा पाहण्यासाठी चार किलोमीटरपर्यंत रांगा

शनिपार मंडळाचा 'शंभाला' हा देखावा सध्या विशेष चर्चेत आहे. तिबेट आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले रहस्यमय आणि आध्यात्मिक 'शंभाला' या संकल्पनेवर आधारित हा देखावा आहे. अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधताना लेझर, होलोग्राम, धूर आणि हिमवृष्टीसारखे इफेक्ट वापरण्यात आले आहेत.

हा देखावा पाहण्यासाठी तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. भयपट, रहस्य, अध्यात्म, इतिहास आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम पाहायला मिळत असून, देखावे हेच गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरत आहेत. भुताचा वाडा, झपाटलेला वाडा अशी नावे गर्दी आकर्षित करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT