Pune Ganesh Visarjan Rangoli: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत रांगोळीतून भेसळीविरोधी जनजागृती

टिळक चौकात १०० फुटांची भव्य रांगोळी; ३५० ते ४०० रंगावलीकारांचा सहभाग
Ganesh Visarjan Rangoli
Ganesh Visarjan RangoliPudhari
Published on
Updated on

पुणे: ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणरायाच्या जयघोषात रंगणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत यंदा रांगोळीच्या पायघड्यांमधून जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. 'भेसळयुक्त पदार्थांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम' हा विषय केंद्रस्थानी ठेवून अन्नपदार्थ, औषधे, दुग्धजन्य पदार्थ यांसह विविध क्षेत्रांतील भेसळीविरोधात नागरिकांना सजग करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गांवर चौकाचौकांत आकर्षक रांगोळीच्या पायघड्या साकारण्यात येणार आहेत.

Ganesh Visarjan Rangoli
Pune Ganeshotsav: शिवाजीनगरात देखाव्यांची पर्वणी; गड-किल्ल्यांपासून स्वामी समर्थांच्या जीवनकार्यापर्यंत; इतिहास-धर्माचा जागर

अन्नातील भेसळ रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर धडक कारवाया सुरू असून, नियम न पाळणाऱ्या हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. अन्नभेसळीविरोधातील कारवाई आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी अन्नभेसळीवर स्वत: जागरूक राहून भेसळ रोखण्यासाठी काय करावे, या महत्त्वपूर्ण विषयावर रांगोळ्यांच्या पायघड्यांमधूनही जनजागृती केली जाणार आहे.

Ganesh Visarjan Rangoli
Pune Traditional Ganesh Idols: पुण्याच्या बाप्पाची १३० वर्षांची परंपरा; मूर्ती बदलली, पण पर्यावरणभान कायम

टिळक चौकात तब्बल १०० फुटांची रांगोळी साकारण्यात येणार

महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून टिळक चौकापर्यंत रांगोळी काढण्याची अकादमीची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यंदाही सकाळी सात वाजल्यापासून रंगावलीकार रांगोळी काढण्यास सुरुवात करतील. टिळक चौकात तब्बल १०० फुटांची रांगोळी साकारण्यात येणार आहे. अन्य नऊ चौकांमध्ये २५ ते ३० फुटांच्या रांगोळ्या काढण्यात येणार आहेत.

Ganesh Visarjan Rangoli
Pune Ganeshotsav Traffic Congestion: मंडप रस्त्यावर, देखावे रस्त्यावर, वादनही रस्त्यावर; पुणेकरांचा सवाल, ‘मग आम्ही जायचे कुठून?’

मिरवणुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी गालिचा रांगोळी साकारण्यासह पायघड्याही काढल्या जाणार आहेत. त्यासाठी अंदाजे चौदाशे किलो रांगोळीचा वापर करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर रांगोळी, गुलाल आणि विविध रंगांचा वापर केला जाणार आहे. ८ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील सुमारे ३५० ते ४०० रंगावलीकार या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी सुमारे १ हजार किलो पांढरी रांगोळी, ७०० किलो गुलाल आणि १२०० किलो विविध रंग वापरण्यात येणार आहेत.

Ganesh Visarjan Rangoli
Pune Foreign Funds Case: बोगस कंपन्यांच्या नावावर परदेशात ४,४२७ कोटींचा निधी; पुण्यात दोन सीएंवर गुन्हा

याविषयी अकादमीचे संचालिका रोमा अमर लांडे म्हणाल्या, रंगावलीकार गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत आहेत. सकाळी सात वाजता ते रांगोळी काढण्यास सुरुवात करतील. नऊ चौकांमध्ये २५ /३० फुटी, तर टिळक चौकात शंभर फुटी रांगोळी काढण्यात येणार आहे. अन्न भेसळीविरोधात नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news