...जेव्हा अपघातग्रस्तांच्या मदतीला विघ्नहर्ता न्यास धावून जाते! Pudhari
पुणे

Vighnaharta Nyas Help: ...जेव्हा अपघातग्रस्तांच्या मदतीला विघ्नहर्ता न्यास धावून जाते!

रात्रीपर्यंत 350 गणेशभक्त रुग्णालयात दाखल

पुढारी वृत्तसेवा

Vighnaharta Nyas Ganesh Visarjan Help

पुणे: शहरात शनिवारी रात्री एक वाजेपर्यंत सुमारे 350 गणेशभक्तांना मिरवणुकीदरम्यान अपघात, अस्वस्थता आणि काही ना काही त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टिळक रस्त्यावरील मिरवणुकीमध्ये अशाच अस्वस्थ झालेल्या एका गणेशभक्ताला विघ्नहर्ता न्यासचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी स्वतः प्रचंड गर्दीतून रुग्णवाहिकेचे सारथ्य करीत रुग्णालयात दाखल केले.

शनिवारी रात्री बाराच्या सुमारास ग्राहकपेठ चौकात ढोलवादकाचा टिपरू एका गणेशभक्ताला लागला आणि तो चक्कर येऊन अस्वस्थ झाला. तेथे उपस्थित असलेल्या न्यासाच्या वैद्यकीय मदत पथकातील जयवंत जानगुडे, नीलेश देसर्डा, मोनिश बाबरिया, गजेंद्र देशपांडे, डॉक्टर्स व अन्य कार्यकर्त्यांनी तातडीने संबंधित गणेशभक्ताला रुग्णवाहिकेतून पूना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. (Latest Pune News)

त्यानंतर लगेचच नदीपात्रामध्ये एका दुचाकीस्वाराने तरुणाला उडविल्याची माहिती न्यासाकडे आली. तीच रुग्णवाहिका घेऊन न्यासच्या वतीने बेशुद्धावस्थेतील तरुणासही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान 15 पोलिस कर्मचार्‍यांनाही त्रास झाल्याची माहिती डॉ. भोई यांनी रात्री दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.

उन्हामुळे घाम येणे, अंगातील पाणी कमी होणे, अपघात या कारणांमुळे गणेश भक्तांना त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. टिळक रस्त्यावर न्यासच्या वतीने प्रवीण चोरबेले, अनिल भन्साळी आणि अन्य कार्यकर्ते आणि पोलिसांनी मिरवणुकांचे स्वागत केले.

प्रचंड गर्दीतही रुग्णवाहिकेस मिळाला रस्ता

टिळक रस्त्यावर मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांची दुतर्फा प्रचंड गर्दी होती. रात्री गणेशभक्तांना काही ना काही कारणाने त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेस वाट मोकळी करून दिली जात होती. रात्री 12 पर्यंत पोलिसांचा ताफा रस्त्यावर विरळ दिसत होता. मात्र, डीजे वाद्य बंद होताच दोन मंडळांतील अंतर कमी करण्यास पोलिसांनी प्राधान्य दिले. रात्री ढोल-ताशा पथकाचे वादन सुरू राहिले. मात्र, मिरवणुका रेंगाळल्याचे चित्र कायम होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT