

पुणे: राज्यातील बहुतांश भागातून मोठा पाऊस कमी झाला असून, कोकण आणि मध्यमहाराष्ट्रातील काही भागात 10 सप्टेंबरपर्यंत तुरळक पावसाचा अंदाज आहे. गणेशविसर्जन मिरवणुकीला पावसाने उघडीप दिली. (Latest Pune News)
मात्र, दुसर्या दिवशी रविवारी सकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान राज्यातील बहुतांश भागातील मोठा पाऊस कमी झाला असून, 10 सप्टेंबरपर्यंत हलका पाऊस राहील. फक्त पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा भागात 8 ते 10 सप्टेंबर या तीन दिवसांत मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.