Fish  Pudhari File Photo
पुणे

Pune Fish Prices: पुण्यात मासळी महागली; आवक निम्म्यावर, चिकन-मटणाचे दर मात्र स्थिर

पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंद असल्याने पूर्व किनारपट्टीवरून मर्यादित आवक; सर्व प्रकारच्या मासळीच्या किमतीत वाढ, अंडीही महागली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी सध्या पूर्णपणे बंद असल्याने पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील हावडा येथून मासळीची आवक होत आहे. मात्र, ही आवक नेहमीच्या तुलनेत निम्मीच असल्याने सर्व प्रकारच्या मासळीचे दर वाढले आहेत.

अनेक प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध नसल्याची माहिती गणेश पेठ येथील मासळी व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, मागणी आणि पुरवठा यांचा समतोल असल्याने चिकन व मटणाचे दर मागील आठवड्याप्रमाणेच स्थिर आहेत. मात्र, अंड्यांच्या दरात वाढ झाली असून गावरान अंडी शेकड्यामागे ४० रुपये, तर इंग्लिश अंडी शेकड्यामागे १५ रुपयांनी महागली आहेत.

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २८) खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीच्या मासळीची १०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० ते ८०० किलो इतकी आवक झाली. तेलंगणा येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे २० ते २५ टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : २२००-२४००, मोठे : १८००-२०००, मध्यम : १४००-१६००, लहान : ११००-१३००, भिला : ७००-८००, हलवा : १०००-११००, सुरमई : लहान ८०० ते १००० मोठी : १५००-१८००, रावस : १०००-१२००, घोळ : ९००-१०००, करली : ४००-५५०, पाला : १२००-१४००, वाम : पिवळी १०००-१२००, काळी : ५००-६००, ओले बोंबील : ४००-६००. कोळंबी : लहान : २५०-३५०, मध्यम : ४००-६००, मोठी : ६५०-७५०, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १७००-१८००, मोरी : ४००-६००, खेकडे : ४००-५००, चिंबोर्‍या : ६००-७००.

खाडीची मासळी:

तांबोशी : ६००-७००, बांगडा : ३५०-४००, बेळुंजी : १६०-२००, तिसर्‍या : २८०-३२०, तारली : ४५०-५५०. नदीतील मासळी : रहू : १५०-१८०, कतला : १८०-२४०, मरळ : ३००-४००, शिवडा : २५०-३००, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१८०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ६०-१६०, वाम : ४००-५५०. मटण : बोकड ८००, बोलाई ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २६०, लेगपीस ३२०, जिवंत कोंबडी २००, बोनलेस ३६०. अंडी : गावरान (शेकडा) ११६० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ७२०, डझन ९६, प्रतिनग ८.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT