पुणे: नवरात्रोत्सव संपल्यानंतर पुणेकरांचा कल पुन्हा मांसाहाराकडे वाढल्याने मासळी, मटण आणि चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात १० टक्क्यांनी, तर मटणाच्या दरात किलोमागे ४० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, मागणी वाढूनही चिकनचे दर स्थिर आहेत. अंड्यांच्या बाजारातही दरवाढीचे चित्र असून, इंग्लिश अंड्यांच्या घाऊक भावात शेकड्यामागे ३० रुपयांची वाढ झाली आहे.
गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २५) खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची २०० ते ४०० किलो आणि नदीच्या मासळीची २०० ते ४०० किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून १० ते १५ टन आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : १८००-२२००, मोठे : १५००-१८००, मध्यम : १२००-१५००, लहान : ९००-१०००, भिला : ५००-७००, हलवा : ६००-७००, सुरमई ५००-८००, रावस : ८००-९००, घोळ : ६००-८००, करली : ३००-४००, भिंग : ४००-५००, पाला : लहान : ६००-७०० मोठा : १२००-१५००, वाम : पिवळी ६००-८००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : १००-२००.
कोळंबी : लहान : १५०-२४०, मध्यम : ३५०-४८०, मोठी : ६००-८००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : १५०-२००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ३००-३५०, चिंबोर्या : ६००-८००. खाडीची मासळी - सौंदाळे : २४०-२८०, खापी : २००-२४०, नगली : ३००-४००, तांबोशी : ४००-५००, पालू : २००-२४०, लेपा : २००-२४०, बांगडा : १८०-२४०, शेवटे : २००-२४०, बेळुंजी : १२०-१८०, तिसर्या : २५०-३००, खुबे : १२०-१६० तारली : २००-२४०.
नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४००, शिवडा : १८०-२००, खवली : १८०-२००, आम्ळी : ८०-१४०, खेकडे : २५०-३००, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८८०, बोलाईचे ८८०, खिमा ८८०, कलेजी ९२०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२१० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ६३०, डझन ८४, प्रतिनग ७.००