Fish  Pudhari File Photo
पुणे

Pune Fish Market Rates: सणासुदीचा मासळी बाजाराला फटका! आवक घटूनही दरात ५ ते १० टक्क्यांची घसरण

गणेश पेठ बाजारात ग्राहकांची वर्दळ रोडावली; मटण, चिकनचे दर स्थिर, इंग्लिश अंडी शेकड्यामागे ४१ रुपयांनी महागली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सणासुदीच्या काळात मांसाहार टाळण्याकडे नागरिकांचा कल असल्याने गेल्या चार दिवसांपासून गणेश पेठ येथील मासळीबाजारात बाजारात ग्राहकांची वर्दळ रोडावली आहे. मासळीची आवक घटूनही मागणीअभावी सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे, मटण, चिकन आणि गावरान अंड्यांचे दर स्थिर असून, इंग्लिश अंड्यांच्या भावात मात्र शेकड्यामागे ४१ रुपयांची वाढ झाली आहे.

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. ८) खोल समुद्रातील मासळी ५ ते ७ टन, खाडीच्या मासळीची १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची १०० ते २०० किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून ५ ते ७ टन आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १६००-२२००, मोठे : १५००-१७००, मध्यम : ११००-१३००, लहान : ८००-९५०, भिला : ७००-८००, हलवा : ६००-८००, सुरमई ७००-१०००, रावस : ७००-१०००, घोळ : ७००-८००, करली : ३००-३५०, भिंग : ३००-४००, पाला : लहान : ८००-९०० मोठा : १२००-१५००, वाम : पिवळी ७००-९००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : १५०-२४०.

कोळंबी : लहान : १८०-२४०, मध्यम : ३६०-४८०, मोठी : ५२०-७००, जम्बो प्रॉन्स : १०००-१२००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १८००-२२००, मोरी : २००-३००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २४०-२८०, खेकडे : ३५०-४००, चिंबोर्‍या : ६००-७००. खाडीची मासळी - सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, नगली : ३५०-४००, तांबोशी : ४५०-५५०, पालू : २४०-२८०, लेपा : २५०-३००, बांगडा : २००-२५०, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १००-१५०, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १५०-१८० तारली : २००-२५०

नदीतील मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १६०-२००, मरळ : ३००-३५०, शिवडा : २००-२५०, खवली : १५०-२००, आम्ळी : ८०-१४०, खेकडे : २५०-३००, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८८०, बोलाईचे ८८०, खिमा ८८०, कलेजी ९२०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२७० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ७११, डझन ९३, प्रतिनग ८.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT