पुणे: पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंद असतानाच आंध्र प्रदेशातील वादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील मासेमारीही प्रभावित झाली आहे. त्यामुळे, गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळीची आवक आणखी घटून सर्व प्रकारच्या मासळीचे दर वीस ते तीस टक्क्यांनी वधारले आहे. बाजारात ताज्या मालाचा पुरवठा कमी होत असून शीतगृहातील माल जास्त असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. मटण, चिकन आणि गावरान अंडीचे भाव स्थिर असून, इंग्लिश अंडीच्या दरात शेकड्यामागे ३० रुपयांची वाढ झाली आहे.
गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. १२) खोल समुद्रातील मासळी ८ ते १० टन, खाडीच्या मासळीची नाममात्र आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. तेलंगणा येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १७००-१८००, मध्यम : १५००-१७००, लहान : १३००-१४००, भिला : ९००-१०००, हलवा : १०००-१२००, सुरमई १०००-१४००, रावस : १०००-१२००, घोळ : १०००-१२००, करली : ५००-६००, पाला : १५००-१६००, वाम : पिवळी १०००-१२००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : ४५०-६००.
कोळंबी : लहान : ३५०-४००, मध्यम : ४००-५५०, मोठी : ६००-६५०, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ४००-५००, राणीमासा : ३००-३५०, खेकडे : ४००-४५०, चिंबोर्या : ६००-७००. खाडीची मासळी - तांबोशी : ६००-६५०, लेपा : ४००-४५०, बांगडा : लहान २५०-३००, बेळुंजी : १८०-२००, तिसर्या : २५०-३००.
नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३००-४००, शिवडा : २५०-३००, खवली : २००-२५०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ६०-१६०, वाम : ४००-६००. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) ११०० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ७४०, डझन ९६, प्रतिनग ८.