पुणे: मासळी, मटण आणि चिकनला बाजारात चांगली मागणी आहे. मागणीच्या तुलनेत मासळीची आवक आणि मटणाचा पुरवठा समाधानकारक होत असल्याने दोन्हींचे भाव स्थिर आहेत. मात्र, चिकनच्या दरात किलोमागे १० रुपयांनी घट झाली आहे. दुसरीकडे, गावरान अंड्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत जैसे थे आहेत. इंग्लिश अंड्यांच्या घाऊक दरात शेकड्यामागे १० रुपयांची घट झाली असली, तरी किरकोळ बाजारातील डझन आणि प्रतिनगाचे दर कायम आहेत.
गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २२) खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीच्या मासळीची ३०० ते ५०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ६०० किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून २० ते २५ टन आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : १६००-२२००, मोठे : १५००-१६००, मध्यम : ११००-१४००, लहान : ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-७००, सुरमई ५००-१०००, रावस : ७००-८००, घोळ : ७००-८००, करली : ३००-४००, भिंग : ३००-४००, पाला : १०००-१५००, वाम : पिवळी ४००-१०००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : २४०-२८०.
कोळंबी : लहान : १६०-२५०, मध्यम : ४००-५५०, मोठी : ६००-७५०, जम्बो प्रॉन्स : १०००-१२००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : २०००-२४००, मोरी : २५०-४००, मांदेली : १००-१६०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३५०-४५०, चिंबोर्या : ६५०-७५०. खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : २००-२५०, नगली : ३५०-४५०, तांबोशी : ४५०-५५०, पालू : ३००-३५०, लेपा : २५०-३००, बांगडा : २००-२५०, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १२०-१६०, तिसर्या : ३००-३५०, खुबे : १००-१५० तारली : १८०-२४०
नदीतील मासळी : रहू : १५०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४५०, शिवडा : १८०-२२०, खवली : १५०-२००, आम्ळी : १००-१४०, खेकडे : २५०-३५०, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८८०, बोलाईचे ८८०, खिमा ८८०, कलेजी ९२०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) १२७० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ६९५, डझन ९६, प्रतिनग ८.