Law Pudhari
पुणे

Maintenance Case India: स्पर्धा परीक्षेच्या शिक्षणासाठी पतीने आर्थिक मदत देण्याचे न्यायालयाचे निर्देश

पत्नीला 30 हजार रुपये पोटगी; पुणे कौटुंबिक न्यायालयाचा आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या पत्नीचे शिक्षण आणि दैनंदिन खर्चासाठी पतीने दरमहा 30 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. खान यांनी दिला.

शिक्षणासह पत्नीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ठराविक रक्कम आवश्यक असल्याचेही नमूद करत आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करावी, असेही न्यायालयाने म्हटले. मतभेदांमुळे विभक्त राहण्याची वेळ आल्यानंतर पत्नीने वकिलांमार्फत न्यायालयात धाव घेतली होती. यादरम्यान तिने पोटगीसाठी अर्ज केला होता. ती सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, तिच्याकडे कोणतेही स्वतंत्र उत्पन्न नाही.

राहणीमान, अभ्यास साहित्य, फी आणि इतर दैनंदिन खर्च भागविणे कठीण जात असल्याने पतीकडून आर्थिक साहाय्य देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तिने केली होती. तसेच पतीकडून आवश्यक खर्चासाठी पुरेशी मदत मिळत नसल्याचेही तिने अर्जात नमूद कले होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने पतीचे उत्पन्न, पत्नीची शैक्षणिक, आर्थिक गरज आणि तिची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत दरमहा 30 हजार रुपये पोटगी मंजूर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT