तोतया आयपीएस महिलेसह दोघांना बेड्या  File Photo
पुणे

Pune Fake IPS Arrest: नामांकित दुकानातून चप्पल खरेदी, पैसे न देताच पळ काढला; तोतया आयपीएस महिलेसह दोघांना बेड्या

Kondhwa Police Station | पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दोघींच्या विरुद्ध यापुर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Fake IPS Woman Pune

पुणे : लष्कर पोलिसांनी एका तोतया आयपीएस महिलेसह दोघांना अटक केली आहे. बनावट ओळखपत्र दाखवून, घरात लग्नाचा कार्यक्रम असल्याची बतावणी करत कॅम्पमधील एका नामांकीत दुकानातून चप्पल खरेदी केल्यानंतर पैसे न देता त्यांनी पोबारा केला होता. मिनाज मुर्तजा शेख (वय 40), रिबा मुर्तजा शेख (वय 19), राहणार दोघी बुर्ज अल मर्जाना सोसायटी कोंढवा) अशी दोघा मायलेकीची नावे आहेत. याप्रकरणी, दुकानदार आझम इक्रराब शेख (रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दोघींच्या विरुद्ध यापुर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. दोघीना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. त्यांच्याकडून 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुकान एम.जी. रोड कॅम्प येथे फिर्यादींचे कलिज नावाचे चप्पल, बुट विक्रीचे दुकान आहे. 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दुकानात आल्या.

मिनाज हिने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल व बुट खरेदी करून कामगाराला 'पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल' असे सांगितले. मात्र पैसे न देता तब्बल 17 हजारांचा माल घेऊन दोघी पसार झाल्या.

प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती भराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार लोकेश कदम व अमोल कोडीलकर हे करत होते. एम.जी. रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींचा ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागला. अखेर 1 व 2 ऑक्टोबर रोजी दोघींना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून तब्बल 45 हजार रुपये किमतीच्या चप्पला व बुट हस्तगत झाले. याशिवाय कॅम्प परिसरातील मचमोर या दुकानातून चोरीला गेलेली काही इमिटेशन ज्वेलरीही जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहीते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT