Farmers loan waiver Pudhari
पुणे

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा बँकेच्या 3.15 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 2102.91 कोटी रुपयांची अपेक्षित मदत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एकूण 3 लाख 15 हजार 569 शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे, तर कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या शेतकरी सभासदांना सुमारे 2 हजार 102 कोटी 91 लाख रुपयांची रक्कम मिळतील, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

योजनेनुसार रुपये दोन लाखापर्यंत थकीत पीक कर्जामध्ये 83 हजार 376 शेतकऱ्यांना 749.14 कोटी, रुपये दोन लाखांपुढील थकीत पीककर्ज योजनेत (एकवेळ समझोता योजना-ओटीएस) 21 हजार 299 शेतकऱ्यांना 425.98 कोटी रुपये, तर प्रोत्साहनपर लाभ योजनेत 2 लाख 10 हजार 894 शेतकऱ्यांना 927.79 कोटी रुपये मिळून एकूण 2102 कोटी 91 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाद्वारे अपात्रतेचे निकष लावले जाणार आहेत. त्यानंतरच पात्र सभासद यादी तयार होणार असल्याने बँकेने दिलेल्या माहितीमधील पात्र लाभार्थीसंख्या व लाभाची रक्कम कमी होणार आहे किंवा बदलणार असल्याचेही प्रा. दुर्गाडे यांनी सांगितले.

बँकेच्या लेखनिकच्या 356 पदभरतीसाठी मुलाखती सुरू...

बँकेंने एमकेसीएलमार्फत राबविलेल्या लेखनिकांच्या भरती प्रक्रियेत मुलाखतीस 1071 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यातून 356 लेखनिकांची पदभरती होणार आहे. त्यांच्या मुलाखती यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे 12 व 13 जून आणि 15 जून रोजी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT