पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने समाजातील २ हजार भाविकांसाठी हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्री रामलल्ला व धर्मध्वज दर्शनासाठी मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले.
या वेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, शंभूराज खुटवड, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. या यात्रेमुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना प्रभू श्रीरामलल्लांच्या दर्शनाचा लाभ मिळत असून, भाविकांमध्ये मोठा उत्साह व भक्तिभाव पाहायला मिळत आहे.
यात्रेच्या नियोजनामध्ये भाविकांची सुरक्षितता, निवास, भोजन व प्रवासाची योग्य व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने आयोजित अयोध्या यात्रेत सहभागी नागरिक.