Cyber Fraud Pudhari
पुणे

Pune Cyber Fraud Investment Scam: पुण्यात सायबर फसवणूक; गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची 52 लाखांची फसवणूक

व्हॉट्सॲप लिंकद्वारे बनावट नफा दाखवून गंडा; सायबर पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कमी गुंतवणुकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल 52 लाख 72 हजारांना ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना 30 जानेवारी ते 2 एप्रिल 2026 कालावधीत नऱ्हेत घडली आहे. याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने साबयर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाईलधारक, लिंकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिला नऱ्हेत राहायला असून, 30 जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉट्‌‍सॲपद्वारे जाहिरात पाठवली होती. त्यामध्ये कमीत कमी गुंतवणुकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेला लिंक पाठवून डाऊनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला कमी गुंतवणुकीवर जादा नफा झाल्याचे दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांच्याकडून 52 लाख 72 हजार रुपये वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

तरुणाला 22 लाखांचा गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची 22 लाखांची फसवणूक जडेजा बदर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तरुणाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना पैसे पाठवण्यास भाग पाडून तब्बल 21 लाख 71 हजारांना ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 15 जून 2025 ते 3 फेबुवारी 2026 कालावधीत डेक्कन परिसरात घडली. याप्रकरणी तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT