crime against women representative image Pudhari
पुणे

Pune Crime: आळंदीत मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर बलात्कार, गुन्ह्यात महिला कीर्तनकार सहआरोपी

Alandi Latest News: अहिल्यानगर येथून अपहरण करुन आळंदीत ठेवले डांबून ; कीर्तनकार महिलाच झाली गुन्ह्यात साथीदार

पुढारी वृत्तसेवा

Alandi Crime News:

आळंदी : आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सबंधित युवतीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार अहिल्या नगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

पिडीत युवतीच्या फिर्यादीनुसार दि.२ जून २०२५ रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना, तिच्या ओळखीच्या महिला ह्या तिला शेतात चल असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या. वाटेत एका काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून MH 43 CC 7812 आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एक अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. त्या वेळी आरडा-ओरडा केल्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आली.

त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत नेण्यात आले. तेथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, किर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने ११२ नंबर वरून मदत मागितली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तींना आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

सुरुवातीला घाबरल्यामुळे पीडित युवतीने तक्रार दिली नव्हती, परंतु घरच्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर ७ जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रविण प्रल्हाद आंधळे, गाडीचा अनोळखी चालक, सुनिता अभिमन्यु आंधळे, अभिमन्यु भगवान आंधळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरण, जबरदस्ती, बलात्कार, धमकी देणे आणि गुन्हेगारी कट रचणे यासारखे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आळंदी परिसरात खळबळ उडाली असून संस्थेतील मुलींच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT