सावकारी, विनयभंगप्रकरणी दौंड (ता. दौंड, जि. पुणे) नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश जाधव यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राजेश जाधव यांच्यावर खासगी सावकारी व महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेश जाधव यांनी एका महिलेला २ लाख रुपये आठ टक्के व्याजाने डिसेंबर २०१९ रोजी दिले होते. ते पैसे या महिलेला मुदतीत फेडता न आल्याने राजेश जाधव याने फिर्यादीच्या बहिणीच्या घरामध्ये अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच शरीरसुखाची मागणी केली. पैसे कसे वसूल करायचे हे मला माहिती आहे. तू जर मला पैसे दिले नाहीस तर मला वेळ दे, असे म्हणून धमकावले. या महिलेने पोलीस ठाण्यात राजेश जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली. राजेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.