पुणेः मागील काही दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीने पुणेकरांना हुडहुडी भरली होती. मात्र रविवारी किमान तापमानात २ ते ३ अंशाने घट झाली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत किंचित ब्रेक लागल्याचे दिसून आले राज्यात अहिल्यानगर येथे ८.४ तर पुणे ९.४ अंशांवर गेले होते.
गत पाच ते सहा दिवस राज्यात थंडीची लाट तीव्र होती. मात्र रविवारपासून थंडीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली. बहुतांश भागातील किमान तापमानात वाढ झाली होती. राज्याचा पारा ६.६ अंशांवरून ८ ते १० अंशांवर गेला आहे.
अहिल्यानगर ८.४, पुणे ९.४, जळगाव १०, कोल्हापूर १४.५, महाबळेश्वर १२.३, मालेगाव ८.४, नाशिक ९.९, सांगली १२.७, सातारा ११, सोलापूर १३.९, मंबई २०.९,धाराशिव ११, छ.संभाजीनगर ११.४, परभणी ११.४, नांदेड ११.४