Arrested Pudhari
पुणे

Pune crime news: वेश्या व्यवसायातून दोन बांगलादेशी महिलांची सुटका; महिला दलालासह दोघे गुन्हे शाखेकडून जेरबंद

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने टाकलेल्या छाप्यात दोन बांगलादेशी पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांच्या माध्यमातून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचे रॅकेट पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने टाकलेल्या छाप्यात दोन बांगलादेशी पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

तर, महिला दलालासह दोघांना अटक केली. बुधवार पेठेत सातत्याने अशा कारवाया होत असतानाही बांगलादेशी महिलांचा सहभाग असलेली प्रकरणे उघडकीस येत असल्याने या रॅकेटची व्याप्ती आणि त्यामागील साखळीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शुली बेगम अफजल शेख उर्फ प्रीती रणजित पात्रा (वय ३९) आणि रणजित गदाधर पात्रा (वय ४२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगमध्ये बांगलादेशी महिलांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी येथे कारवाई केली. येथून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन बांगलादेशी महिलांची सुटका केली. तर, दलाल महिलेसह तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.

प्राथमिक तपासात आरोपी शुली बेगम ही मूळची बांगलादेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक वर्षांपासून ती पुण्यात वास्तव्यास असून, तिने येथे विवाह करून आधार कार्डही मिळविल्याचे उघड झाले आहे.

मात्र, याची खातरजमा पोलिसांकडून सुरू आहे. तिच्याकडे असलेली कागदपत्रे, देशातील वास्तव्याची वैधता तसेच या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक विक्रम मिसाळ, अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, किशोर भुजबळ, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, वैशाली इंगळे, रेश्मा कंक यांच्यासह पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT