पुणे: कडाक्याच्या उन्हामुळे आणि सध्या कोणताही मोठा सण-उत्सव नसल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याने बाजारात मालाला अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणी कमी आणि पुरवठा तुलनेने संतुलित असल्याने बहुतांश जिन्नसांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. मात्र, शेंगदाणा आणि भगरीच्या दरात वाढ झाली आहे.
दक्षिण भारतातून होणारी शेंगदाण्याची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. गेल्या आठवड्याभरात घाऊक बाजारात शेंगदाण्याच्या दरात किलोमागे सात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे भगरीच्या भावातही किलोमागे सुमारे पाच रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, गुळाला बाजारात चांगली मागणी कायम आहे.
मात्र, ऊसाची उपलब्धता घटल्याने अनेक गुऱ्हाळे बंद झाली आहेत. त्यामुळे गुळाची बाजारातील आवक कमी झाली असून सध्या गुळाचे दर टिकून आहेत. आगामी काळात पुरवठा आणखी घटल्यास गुळाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, खाद्यतेल, विविध प्रकारची धान्ये, साबुदाणा, लाल मिरची तसेच नारळ यांच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल असल्याने हे जिन्नस स्थिर दरात विकले जात आहेत.
येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:
साखर (प्रतिक्विंटल) 4000-4500 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2650-2900, रिफाईंड तेल 2300-3100, सरकी तेल 2150-2600, सोयाबीन तेल 2150-2600, पामतेल 2150-2450, सूर्यफूल रिफाईंड तेल 2350-2500, खोबरेल तेल 4000, वनस्पती 2050-2550 रु. तांदूळ :- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4150-5000, एच.एम.टी. कोलम 5300-5600, लचकारी कोलम 6100-6600, चिन्नौर 6500-7000, 1121-11500-12500, आंबेमोहोर (सुवासिक) 14500-16500, बासमती अखंड 12500-14500, बासमती दुबार 10000-10500, बासमती तिबार 10500-11000, बासमती मोगरा 6000-6500, बासमती कणी 4500-5000, 1509-1000-11000, इंद्रायणी 6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4150-4400, लोकवन नं. 2 3700-3900, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5900-6500, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी :- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300रु. गूळ :- गूळ नं. 1 4600-4750, गूळ नं.2 4450-4550 गूळ नं.3 4300-4400, बॉक्स 4400-5400 रु. डाळी :- तूरडाळ 10000-12500, हरभराडाळ 6700-7000, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7500-7600, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु.
कडधान्ये :-हरभरा 6200-6900, हुलगा 5500-6000, चवळी 7800-9800, मसूर 7300-8100, मूग 9300-12500, मटकी गावरान 16000-16500, मटकी पॉलिश 7000-7900, मटकी गुजरात 16000-17000, मटकी राजस्थान 6600-7000, मटकी सेलम 17200-18400, वाटाणा हिरवा 5200-5500, वाटाणा पांढरा 5000-5200, काबुली चणा 7200-10600 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 6200, साबुदाणा नं.2 5800, साबुदाणा नं.3 5600 रु. वरई भगर :-13500-14000, सावा भगर 13000-13500 रु. गोटा खोबरे 3900-4100 रु. शेंगदाणा :- जाडा 11000-12500, स्पॅनिश12500-14000, घुंगरु 11500-12500 धने :- गावरान 12000-13000, इंदूर 15000-17000 इंदुर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पोहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 550-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1750, मैदा 1650-1750, बेसन :- (50 किलोस) 3600-4250 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 60000-65000, ब्याडगी 35000-50000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 24000-26000, खुडवा गुंटूर 12000-13000, खुडवा ब्याडगी 16000-18000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1700-1850, मद्रास 4600-4800, पालकोल जुना 2100-2300, सापसोल 3500-5000 रु.