Peanut Pudhari
पुणे

Pune Bhusar Bazar Rates: पुणे भुसार बाजारात मंदी; शेंगदाणे तेजीत तर गोटा खोबऱ्याच्या दरात घसरण

पुण्यातील मार्केट यार्ड भुसार बाजारात खरेदी मंदावली असून शेंगदाण्याच्या दरात तेजी आली आहे. गोटा खोबरे, साखर, तांदूळ, डाळी, खाद्यतेल आणि गुळाचे दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मार्केट यार्डातील भुसार बाजारात सध्या मंदीचे वातावरण कायम आहे. कडक ऊन, उन्हाळी सुट्ट्यांमुळे नागरिक बाहेरगावी गेल्याने तसेच सध्या कोणतेही मोठे सण-उत्सव नसल्याने बाजारातील खरेदी मंदावली आहे. डिझेल दरवाढ किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्यतेल कमी वापरण्याचे केलेले आवाहन, याचा बाजारावर कोणताही विशेष परिणाम झालेला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तुटवडा आणि परदेशातील वाढती निर्यात यामुळे शेंगदाण्याच्या भावात तेजी असून, आठवडाभरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांत दर वाढल्याने ग्राहकांनी गोटा खोबऱ्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गोटा खोबऱ्याच्या भावात किलोमागे दहा रुपयांची घट झाली आहे. बेसनच्या दरात 50 किलोमागे दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाचे काम सुरू असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कोलम तांदळाचे उत्पादन घटले असून, त्याच्या दरात किलोमागे तीन ते साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातल्याने साखरेच्या दरात किलोमागे सुमारे वीस पैशांची किरकोळ घट झाली आहे. गुळाला बाजारात मागणी कायम असली, तरी उसाच्या तुटवड्यामुळे गुऱ्हाळे बंद असून, आवक कमी होत आहे. त्यामुळे गुळाचे दर टिकून आहेत. खाद्यतेल, विविध धान्ये, साबूदाणा, भगर आणि नारळाचे दर मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारभाव पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) 4000-4050 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2650-2900, रिफाईंड तेल 2300-3100, सरकी तेल 2150-2600, सोयाबीन तेल 2150-2600, पामतेल 2150-2450, सूर्यफूल रिफाईंड तेल 2350-2500, खोबरेल तेल 4000, वनस्पती 2050-2550 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3650-4200, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4400-7400, एच.एम.टी. कोलम 5500-5800, लचकारी कोलम 6400-6700, चिन्नौर 6500-7000, 1121-11500-12500, आंबेमोहोर (सुवासिक) 14500-16500, बासमती अखंड 12500-14500, बासमती दुबार 10000-10500, बासमती तिबार 10500-11000, बासमती मोगरा 6000-6500, बासमती कणी 4500-5000, 1509-1000-11000, इंद्रायणी 6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4150-4400, लोकवन नं. 2 3700-3900, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5900-6500, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300रु.

गूळ :- गूळ नं. 1 4600-4750, गूळ नं.2 4450-4550 गूळ नं.3 4300-4400, बॉक्स 4400-5400 रु. डाळी:- तूरडाळ 10000-12500, हरभराडाळ 6700-7000, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7500-7600, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु. कडधान्ये:-हरभरा 6400-7000, हुलगा 5500-6000, चवळी 7800-9800, मसूर 7300-8200, मूग 9400-12500, मटकी गावरान 16000-16500, मटकी पॉलिश 7000-7900, मटकी गुजरात 16000-17000, मटकी राजस्थान 6600-7000, मटकी सेलम 17200-18400, वाटाणा हिरवा 5200-5500, वाटाणा पांढरा 5000-5200, काबुली चणा 7200-10600 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 6200, साबुदाणा नं.2 5800, साबुदाणा नं.3 5600 रु. वरई भगर :-13500-14000, सावा भगर 13000-13500 रु. गोटा खोबरे 3900-4100 रु. शेंगदाणा :- जाडा 11000-12500, स्पॅनिश12500-14000, घुंगरु 11500-12500 धने :- गावरान 12000-13000, इंदूर 15000-17000 इंदूर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पोहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 550-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT