

अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत घट झाली असली, तरी दरातही घसरण झाली. भोपळा, हिरवी मिरची, कांदा, बटाटा व वाटाण्याची प्रचंड आवक झाली. फळभाज्या व पालेभाज्यांची आवक आणि भावही घसरले. एकूण उलाढाल 8 कोटी 30 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 3 हजार 250 क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव 500 ते 1,200 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 2,000 क्विंटल झाली. बटाट्याला कमालभाव 1,400 रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. लसणाला 12 हजार रुपये कमालभाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 310 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 4 हजार 500 रुपयांपासून 5 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव:
कांदा : एकूण आवक 3,250 क्विंटल. भाव क्र. 1. 1,200 रुपये, भाव क्र. 2. 1,000 रुपये, भाव क्र. 3. 500 रुपये. बटाटा : एकूण आवक - 2,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,400 रुपये, भाव क्रमांक 2. 1,200 रुपये, भाव क्रमांक 3.800 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोला मिळालेला दर (कंसात):
टोमॅटो - 274 क्विंटल (2,500 ते 3,000 रुपये), कोबी - 170 क्विंटल (800 ते 900), फ्लॉवर - 155 क्विंटल (1,200 ते 1,300), वांगी - 68 क्विंटल (3,000 ते 4,000), भेंडी - 68 क्विंटल (3,500 ते 4,500), दोडका - 48 क्विंटल (4,000 ते 5,000), कारली - 54 क्विंटल (3,500 ते 4,500), दुधीभोपळा - 36 क्विंटल (2,000 ते 3,000), काकडी - 65 क्विंटल (2,500 ते 3,500), फरशी - 11 क्विंटल (14,000 ते 15,000), वालवड - 28 क्विंटल (6,000 ते 7,000), ढोबळी मिरची - 98 क्विंटल (5,000 ते 6,000), चवळी - 28 क्विंटल (2,500 ते 3,500), वाटाणा - 20 क्विंटल (8,000 ते 9,000), शेवगा - 30 क्विंटल (3,000 ते 4,000), गाजर - 115 क्विंटल (2,000 ते 3,000), गवार - 42 क्विंटल (4,500 ते 5,500), आले - 150 क्विंटल (4,500 ते 5,500).
पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेले भाव: मेथी - एकूण 6 हजार 185 जुड्या (1,600 ते 2,000 रुपये ), कोथिंबीर - एकूण 21 हजार 975 जुड्या (2,000 ते 2,500), शेपू - एकूण 2 हजार 590 जुड्या (1,000 ते 1,500), पालक - एकूण 3 हजार 840 जुड्या (600 ते 800).
जनावरे:
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्सी गायींपैकी 32 गायींची विक्री झाली. त्यांना 15 ते 70 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 55 बैलांपैकी 45 बैलांची विक्री झाली. त्यांना 10 ते 40 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. 80 म्हशींपैकी 75 म्हशींची विक्री झाली. त्यांना 30 ते 80 हजार रुपये भाव मिळाला. 22,800 शेळ्या-मेंढ्यापैकी 22,400 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2 ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.