Pune Flower Market Rates: पुणे फुलबाजारात सजावटीच्या फुलांचे दर निम्म्यावर

अधिक मास आणि लग्नसराई संपल्याने डच गुलाब, जर्बेरा, लिलियमच्या मागणीत मोठी घट
Flower
FlowerPudhari
Published on
Updated on

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक स्थिर आहे. अधिक मास सुरू होऊन लग्नसराई संपल्याने सजावटीसाठी लागणाऱ्या डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा, लिलियम, ऑर्चिड तसेच केशरचनेसाठी लागणाऱ्या जिप्सोफिला, मोगरा आदी फुलांच्या मागणीत मोठी घट झाली आहे.

Flower
Pune Fish Market Rates: पुण्यात मासळीचे दर तेजीत; पापलेट 2400 तर लॉबस्टर 2200 रुपये किलो

बाजारात दाखल झालेल्या फुलांच्या तुलनेत मागणी खूपच घटल्याने या फुलांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. तर झेंडू, शेवंती, ॲष्टर आदी सुट्या फुलांचे दर कायम आहेत, अशी माहिती फूल अडतदार सागर भोसले यांनी दिली.

Flower
Ajit Pawar Research Centre: पुण्यातील देशी गाय संशोधन केंद्रासाठी 72.75 कोटींचा निधी मंजूर

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 20-50, गुलछडी : 80-120, ॲष्टर : जुडी 10-20, सुट्टा 100-150, कापरी : 20-50, शेवंती : 50-130, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 20-30, गुलछडी काडी : 20-80, डच गुलाब (20 नग) : 60-120, जर्बेरा : 30-50, कार्नेशियन : 100-150, शेवंती काडी 150-250, लिलियम (10 काड्या) 1000-1500, ऑर्चिड 500-600, ग्लॅडिओ (10 काड्या) : 100-130, जिप्सोफिला : 150-300, लीली बंडल : 5-6, मोगरा : 200-300.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news