Plane Pudhari
पुणे

Pune Airport Expansion: पुणे विमानतळाचा विस्तार; उन्हाळी वेळापत्रकात 15 नवीन स्लॉट

देशातील 37 शहरांशी थेट जोडणी; तीन नवे मार्ग सुरू होणार, प्रवाशांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे विमानतळ प्रशासनाने विमानोड्डाणांच्या संख्येत वाढ करत, समर शेड्युल (उन्हाळी वेळापत्रक 2026) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार पुणे विमानतळाला 15 अतिरिक्त स्लॉट्‌‍स मिळाले असून, आता एकूण स्लॉट्‌‍सची संख्या 235 वर पोहोचली आहे. रविवार (दि. 29 मार्च) पासून हे नवीन वेळापत्रक लागू केले असून, त्यामुळे आता तीन नवे मार्गही वाढणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

या मार्गांवर वाढणार फेऱ्या

पुणे विमानतळावरून सुरू असलेल्या विद्यमान मार्गांवर विमानांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. यामध्ये स्पाइस जेटद्वारे कोलकाता, अकासा एअरद्वारे वाराणसी आणि एअर इंडिया एक्स्प्रेसद्वारे बंगळुरू या मार्गांवरील फेऱ्या वाढवण्याचे नियोजन विमानतळ प्रशासन करणार आहे.

प्रादेशिक जोडणीवर भर

पुणे विमानतळ फक्त मोठ्या महानगरांनाच नाही, तर महाराष्ट्रातील आणि देशातील छोट्या शहरांनाही जोडत आहे. नांदेड, सिंधुदुर्ग, जळगाव आणि किशनगडसारख्या शहरांशी थेट संपर्क उपलब्ध झाल्यामुळे प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

काय बदलणार?

  • दि. 1 मे 2026 पासून 15 नवीन स्लॉट्‌‍स कार्यान्वित होतील. यामुळे विमानांच्या येण्या-जाण्याच्या फेऱ्या वाढणार आहेत.

  • पुणे आता देशातील 37 शहरांशी थेट जोडले गेले आहे.

  • दुबई, बँकॉक आणि अबू धाबी या तीन जागतिक शहरांशी असलेली थेट सेवा उन्हाळी वेळापत्रकातही कायम ठेवण्यात आली आहे.

नवे मार्ग आणि कोणत्या विमान कंपन्यांचे नियोजन

  • नवे विमान मार्ग - कोणती कंपनी सुरू करणार

  • पुणे ते बागडोगरा - एअर इंडिया

  • सोलापूर आणि तिरुपती - स्टार एअर

  • पुणे ते मंगळुरू - फ्लाय 91

पुण्यातील हवाई पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन स्लॉट्‌‍स आणि विस्तारत असलेल्या नेटवर्कमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि पुण्याच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT