Air Pollution  Pudhari
पुणे

Pune Air Pollution: पुण्यात स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी ४१८ कोटींचा निधी; ६६ टक्के खर्च, तरीही धूलिप्रदूषण कायम

रस्ते, पदपथ आणि सफाई यंत्रांवर खर्च; मेट्रोची कामे, बांधकामे आणि रस्त्यांवरील धूळ ठरतेय प्रदूषणाचे कारण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) आणि १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत गेल्या सात वर्षांत पुणे शहरासाठी वितरित केलेल्या ४१८.४५ कोटी रुपये निधीपैकी २७५.२८ कोटी रुपये (६६ टक्के) निधी खर्च केला. तरीही सूक्ष्म धूलिकण अर्थात पीएम-१० चे प्रदूषण पूर्ण आटोक्यात आले नाही, असा दावा 'पुणे एअर ॲक्शन हब'ने केला आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने विकसित केलेल्या पोर्टल फॉर रेग्युलेशन ऑफ एअर पॉल्युशन इन नॉन-अटेनमेंट सिटीज या पोर्टलवरील ताज्या आकडेवारीनुसार, पुण्याला एकूण ४१८.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी २७५.२८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत ९.४५ कोटी रुपये, तर १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ४०९ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते.

पुणे एअर ॲक्शन हबने केलेले दावे

  • या निधीचा वापर रस्ते पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, स्मशानभूमी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या विविध कामांसाठी केला आहे.

  • यामध्ये पुणे शहरातील १२१.४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण, तर १९ कि.मी. लांबीच्या पदपथांची दुरुस्ती केली.

  • रस्त्यांवरील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने दोन यांत्रिक रस्ते सफाई यंत्रे आणि १९ पाण्याचे फवारे (स्प्रिंकलर्स) कार्यान्वित केले आहेत.

  • प्रदूषणाला रस्त्यांवरील धूळ कारणीभूत.

उपलब्ध आकडेवारीवरून पुण्यातील वायुप्रदूषणाच्या स्वरूपात बदल होत असल्याची शक्यता दिसते. पूर्वी ज्वलन प्रक्रियांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांचे वर्चस्व असलेल्या प्रदूषणाचे स्वरूप आता धुळीच्या प्रदूषणाकडे झुकत असल्याचे संकेत मिळत आहेत. शहरी विस्तार, मेट्रोची कामे, रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि बांधकामे यांमधून पीएम-१० या मोठ्या आकाराच्या धूलिकणांची निर्मिती सुरूच आहे
डॉ. राकेश कुमार,अध्यक्ष, सोसायटी फॉर इनडोअर एन्व्हायर्नमेंट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT