AI Pudhari
पुणे

Pune AI Data Center Jobs: पुण्यात AI-डेटा सेंटरचा बूम; रोजगार वाढला, PG-होस्टेलला बाळसे

हजारो तरुणांना नोकरी; हिंजवडी-खराडी परिसरात नव्या संधींची लाट

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: शहरात आजघडीला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सेंटर्स कंपन्यांमुळे राज्यभरातून तरुणाईला रोजगार मिळत आहे. आयटी क्षेत्र वगळता करिअरच्या या नव्या वाटा तरुण वर्गाला मिळत असल्याने शहरात जागोजागी पेइंग गेस्ट, खासगी होस्टेल, खानावळी (मेस) यांची संख्या वेगाने वाढत आहे. पुणे शहर आयटी आणि ऑटोमोबाईल हब आहेच, यात आता एआय आणि डेटा सेंटर्स कंपन्यांची भर पडत आहे. त्यामुळे देशभरातून रोजगारासाठी तरुणाई शहराकडे येत आहे. प्रामुख्याने या क्षेत्रात मुलींची संख्या लक्षणीय आहे. हे क्षेत्र शहराचे ग््राोथ इंजिन ठरू पाहत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

  • मोठे डेटा सेंटर्स: 12

  • मध्यम क्लाऊड कंपन्या: 40

  • दोन्ही क्षेत्रांतील स्टार्टअप: 100

  • राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुणाई नोकरीसाठी शहरात त्यामुळे मेस, पी. जी.सारख्या व्यवसायांना बाळसे

  • हिंजवडी, खराडी, मगरपट्टा, पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक

  • भविष्यात तळेगाव, चाकण भागात वाढ होणार

  • या क्षेत्रात मुलींची संख्या लक्षणीय

वीज आणि पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ

  • सध्या या क्षेत्रात शहरात 10 हजारांपेक्षा जास्त तरुणांना रोजगार आहे. 2030 पर्यंत 2 हजार, तर 2030 पर्यंत 35 हजार तरुणांना रोजगार मिळणार

  • ऑनलाईन बँकिंग व्यवहार वाढले, शासनाच्या सुविधात वाढ, एआय ऑटोमेशनवर कंपन्या वेगाने जात आहेत.

  • स्मार्ट सिटी साठी लागणारे काम याच कंपन्यांना मिळत आहे.

या क्षेत्रातील पगार कसे...

पद अनुभव पगार रु. (महिना )

  • टेक्निशियन फेशर 18 ते 25 हजार

  • नेटवर्क इंजिनीअर 1 ते 3 वर्षे 30 ते 50 हजार

  • क्लाऊड इंजिनीअर 3 ते 5 वर्षे 60 हजार ते दीड लाख

  • एआय, डेटा शास्त्रज्ञ 5 वर्षे पुढ 1.5 ते 3 लाख

  • डेटा सेंटर मॅनेजर सीनिअर 2 लाख ते 4 लाख

या भागात नवे प्रकल्प अन्‌‍ संधी...

  • भाग : चाकण एमआयडीसी

  • तळेगाव औद्योगिक वसाहत

  • प्रकल्प : हायपरस्केल डेटा सेंटर कॅम्पस

  • गुंतवणूक: अंदाजे : 4 ते 6 हजार कोटी रुपये

  • कधी सुरू होणार: सन 2027-28

  • रोजगारः 5 ते 8 हजार

कर्मचारीसंख्या आणि वयोगट...

वर्ष कर्मचारी वय (20 ते 35)

  • 2025 10 हजार 70 %

  • 2030 20 हजार 72%

  • 2035 35 ते 40 हजार 75%

मी जालना या छोट्या गावातून तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले. केवळ बी.कॉम. या पदवीवर नोकरी मिळत नव्हती. मिळाली तरी पगार कमी देत होते. त्यामुळे बंगळुरू येथे जाऊन डेटा ॲनालिस्ट हा एकच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला अन्‌‍ लगेच मला नोकरी मिळली. सुरुवातीला 25 हजार पगार होता. आता तीन वर्षांत 65 हजारांवर गेला आहे. वडील शेतकरी असून, त्यांना माझा अभिमान वाटतो आहे.
कल्पना शिंदे, डेटा ॲनालिस्ट, हिंजवडी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT