Pune PMPML Bus Hijack: पुण्यात थरार! PMPML बस हायजॅक; डेक्कनमध्ये आरोपीला अटक

मद्यधुंद तरुणाचा प्रकार; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती टळली
PMPML Bus Hijack
PMPML Bus HijackPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शनिवारी सायंकाळी एक अत्यंत धक्का दायक आणि थरारक प्रकार समोर आला. पीएमपीएमएलची एक बस एका मद्यधुंद माथेफिरूने थेट महानगरपालिका येथील बसस्थानकातून पळवून नेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, पुणे पोलिसांचे प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळे अवघ्या काही वेळातच आरोपीला डेक्कन परिसरात पकडण्यात यश आले.

PMPML Bus Hijack
Summer Heat Alert | उष्णतेने संपूर्ण राज्य होरपळले; अकोल्याचा पारा 45 अंशांवर

गोपालसिंग बिलबीरसिंग राणा (अंदाजे वय 20, मळ रा. उत्तराखंड) असे पीएमपी बस पळवणाऱ्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. पीएमपी बस चालवत नेल्याप्रकरणात संबंधिताविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोटार व्हेईकल ॲक्ट अंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेने 2012 साली पुण्यात घडलेल्या एसटी बसचालक माथेफिरू संतोष माने प्रकरणाची पुणेकरांना आठवण झाली असून, पोलिसांच्या सतर्कतेने अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली अन्‌‍ मोठा संभाव्य अपघात त्यातून होणारी जीवितहानीसुद्धा टळली आहे.

PMPML Bus Hijack
Baramati NCP Clash | बारामतीत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वादावादी? मतदानाचा टक्का घसरल्याने वाद चिघळला

नेमकी घटना काय?

पीएमपी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी ट्रॅव्हल्स या ठेकेदाराची बस मार्ग क्र. व्हीटी - 94 ( बस क्र. एमएच 12 वायबी 5086) क्रमांकाची बस वाघोली ते मनपा अशी फेरी पूर्ण करून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास डेंगळे पुलाजवळ उभी होती. गॅस भरण्यासाठी जाण्यापूर्वी मूळ चालक बस उभी करून दुसऱ्या बसवर गेला होता. याच संधीचा फायदा घेत एका अज्ञात मद्यधुंद माथेफिरू व्यक्तीने बसमध्ये प्रवेश केला आणि थेट स्टीअरिंगचा ताबा घेत बस पळवली.

PMPML Bus Hijack
Pune Hapus Mango Price Drop: हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण; पुणे बाजारात आवक वाढली

जंगली महाराज रोडवर धाकधूक

हा माथेफिरू बस घेऊन जंगली महाराज रोडने सुसाट डेक्कनच्या दिशेने निघाला. वर्दळीच्या वेळी सार्वजनिक बस अशा प्रकारे अनियंत्रितपणे धावताना पाहून नागरिकांची पाचावर धारण बसली होती. आरोपी ही बस गुडलक चौकापर्यंत घेऊन आला. मात्र, चौकातील गर्दीत बस वळवताना त्याचे नियंत्रण सुटू लागले. तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने बसचा पाठलाग केला आणि आपटे रोडवरून पुन्हा जंगली महाराज रस्त्याच्या दिशेला जाताना असलेल्या सिग्नलजवळ बस अडवून आरोपीला खाली घेतले.

प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर

गाडी गॅस भरायला आणि दुसऱ्या चालकाला द्यायची असल्याने चावी गाडीतच ठेवण्यात आली होती. हीच बाब या घटनेला निमंत्रण देणारी ठरली. या प्रकारामुळे सन 2012 मधील स्वारगेट येथील कुप्रसिद्ध संतोष माने प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. सुदैवाने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

PMPML Bus Hijack
Maharashtra Kidney Transplant Increase: महाराष्ट्रात किडनी निकामी होण्याच्या रुग्णांमध्ये वाढ; प्रत्यारोपण दुपटीने वाढले

ही घटना अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारे बसची चावी गाडीत सोडून जाणे, ही मोठी चूक आहे. आमच्याकडील वैष्णवी ट्रॅव्हल्स या खासगी ठेकेदाराची ही बस होती. त्या ठेकेदारावर आम्ही कडक दंडात्मक कारवाई करत आहोत. कर्तव्यावरील चालक, वाहक, सुपरवायझर आणि कंट्रोलर यांची चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

बस बेवारस स्थितीत सोडणे आणि चावी वाहनातच ठेवणे हा गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित पीएमपीएमएल अधिकारी आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, नेमकी चूक कोणाची आहे याचा सखोल तपास करण्यात येत आहे.

ऋषिकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news