पुणे

पुणे : शिवणे येथील बेकरीला भीषण आग

अविनाश सुतार

वारजे, पुढारी वृत्तसेवा : शिवणे येथील चॉईस बेकरीला भीषण आग लागली. ही घटना आज (सोमवारी) घडली. या आगीत बेकरीचे साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार एनडीए मुख्य रस्त्यावर शिवणे येथे चॉईस नावाची बेकरी असून सकाळच्या वेळी विद्युत पुरवठ्यामधील तांत्रिक कारणामुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. बेकरीतील साहित्य, खाद्यपदार्थांना आग लागल्याने आगीने काही क्षणातच उग्ररूप धारण केले. दरम्यान नागरिकांनी प्रसंगावधान राखत उत्तमनगर पोलीस तसेच अग्निशामक दलाशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे  पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या तीन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत बेकरीतील ३ फ्रीज, खाद्यपदार्थ, ओव्हन मशीन, इलेक्ट्रिक भट्टी, आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या असून अंदाजे १० लाखांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : झुंड सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे त्या विजय बारसेंना काय वाटतं 'झुंड'विषयी ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT