School Pudhari
पुणे

Pune Unauthorized Schools: पुण्यात 13 अनधिकृत शाळांचा पर्दाफाश; पालकांना मनपाचे सावधानतेचे आवाहन

बिबवेवाडी, कोंढवा, उंड्रीसह विविध भागांतील शाळांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मान्यता तपासण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत शहरात 13 शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षांत या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाने 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत 13 शाळा विनाअनुमती सुरू असल्याचे आढळून आले आहे. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने पालकांनी विशेष खबरदारी घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव परिसरातील शाळांचा समावेश आहे. पालकांनी पाल्यांचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची शासकीय मान्यता तपासावी तसेच अनधिकृत शाळांबाबत माहिती मिळाल्यास पालिकेच्या शिक्षण विभागाकडे कळवावी, असेही आवाहन केले आहे.

या आहेत अनधिकृत शाळा

  • न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी

  • महात्मा गांधी प्रशाला, संजय पार्क, येरवडा

  • टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, कोंढवा खुर्द

  • सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक

  • इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर

  • आकांक्षा ॲकॅडमी स्कूल, लोहगाव

  • एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल, मानाजीनगर

  • लेगसी हाय स्कूल, कोंढवा

  • शिबली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, कोंढवा

  • ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री

  • ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कोंढवा

  • ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव बुद्रुक

  • आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT