NAAC New Grading System Delay: नॅक मूल्यांकनात बदलाचा तिढा; मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडिंगला विलंब

नवीन प्रणाली जाहीर होऊनही अंमलबजावणी थांबलेली; उच्च शिक्षण संस्थांमध्ये संभ्रम वाढला
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

गणेश खळदकर

पुणे: राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅक उच्च शिक्षण संस्थांची मूल्यांकनाची श्रेणी पद्धत बंद करून मॅच्युरिटी बेस्ड ग््रेाडिंग प्रणाली सुरू करणार आहे. ही घोषणा होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला. नवीन पद्धतीने मूल्यांकन होणार असल्यामुळे जुन्या पद्धतीचे मूल्यांकन बंद केले आहे. त्यामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयांना मोकळे रान मिळाले असून, नवीन पध्दतीने नॅक मूल्यांकन करण्याला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

SPPU
Leopard Attack: नारायणगाव हादरले; बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलगा जखमी

नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांमध्ये उच्च श्रेणी प्राप्त करण्यासाठी स्पर्धा असते. परंतु, ही श्रेणी पद्धत हद्दपार करण्यात आली आहे. आता नॅक मूल्यांकनात बायनरी पद्धतीचा वापर करण्यात येईल. त्यात मूल्यांकन झाले, मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत, मूल्यांकन झालेले नाही, असे तीन स्तर असतील. ही पद्धत जगातील आघाडीच्या देशांमध्ये वापरली जाते. या पद्धतीमुळे अधिकाधिक उच्च शिक्षण संस्थांनी मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

SPPU
Junnar Crime: आळेफाटा हादरवणारी घटना; निर्दयी बापाकडून मुलांचा खून, मुलीचा मृत्यू

संबंधित मूल्यांकनामध्ये एक ते पाच स्तर तयार करून उच्च शिक्षण संस्थांना त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. स्तर चार हा राष्ट्रीय उत्कृष्टतेचा असेल, तर स्तर पाच हा जागतिक उत्कृष्टतेचा असेल. उच्च शिक्षण संस्थांना मूल्यांकनासाठी डेटा सादर करण्याची प्रक्रिया सोपी होण्यासाठी वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म लागू करण्यात येणार आहे.

SPPU
Kedgaon Sterilization Death Inquiry: केडगाव शस्त्रक्रियेनंतर 21 वर्षीय महिलेचा मृत्यू; चौकशी समितीचा सर्जनवर ठपका

महाविद्यालयांनी नॅकच्या वेबसाइटवर त्यांचा मूल्यांकनासाठीचा डेटा उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यामुळे मूल्यांकनासाठी उच्च शिक्षण संस्थांना भेटी देण्याचे प्रमाण कमी होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षांपासून जुन्या तसेच नवीन, अशा कोणत्याही पध्दतीने उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकनच होत नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

नॅक मूल्यांकनात याची घेतली जाते नोंद

शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधनकार्य आणि विद्या शाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, संस्था, प्रशासन, आर्थिक स्थिती आणि विद्यार्थी सेवा इत्यादीची नोंद नॅक मूल्यांकनात घेतली जाते.

SPPU
Alandi Waste Burning: आळंदी प्रदूषणाच्या विळख्यात; कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त

काय आहे सद्य:स्थिती...

नॅक मूल्यांकन झालेली महाविद्यालये : 8 हजार 749

नॅक मूल्यांकन झालेली विद्यापीठे : 573

ए प्लस प्लस श्रेणी असलेल्या संस्था : 313

ए प्लस श्रेणी असलेल्या संस्था : 830

ए श्रेणी असलेल्या संस्था : 1 हजार 463

बी प्लस प्लस श्रेणी असलेल्या संस्था : 1 हजार 571

बी प्लस श्रेणी असलेल्या संस्था : 1 हजार 672

बी श्रेणी असलेल्या संस्था : 2 हजार 511

सी श्रेणी असलेल्या संस्था : 897

डी श्रेणी असलेल्या संस्था : 64

नॅकची मॅच्युरिटी बेस्ड ग््रेाडिंग प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मागील ‌‘ अ+‌’ दर्जा वैध राहणार असून, पुढील मूल्यांकनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news