Pune Underground Road Project: पुण्यात ‘पाताललोक’ प्रकल्पाची तयारी; 54 किमी भुयारी रस्त्यांचे नियोजन

वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी 34 हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; एसपीव्ही स्थापनेची तयारी
Underground Tunnel
Underground TunnelPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‌‘पाताललोक‌’ संकल्पना मांडत भुयारी मार्ग करण्याचे आश्वासन दिले होते. महापालिका प्रशासनाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पुण्यात 54 किमीचे पाच वेगवेगळे भुयारी मार्ग करण्याचे नियोजन असून, यासाठी 34 हजार कोटी खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्यासाठी, तसेच स्वतंत्र स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी नेमण्यासाठी लवकरच प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

Underground Tunnel
Pune Municipal Security Guard Political Interference: पुणे महापालिका सुरक्षारक्षक नियुक्त्यांवर राजकीय हस्तक्षेप; नवे वाद

पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडवून ती अधिक वेगवान करण्यासाठी महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी भुयारी मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले होते. पुणेकरांना दिलेले हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी महापालिकेने आता नियोजन सुरू केले आहे. या भुयारी मार्गाबाबत सादरीकरण करण्यात आले आहे. पीएमआरडीए आणि महापालिका मिळून या मार्गाचा विकास करणार आहे. याबाबतचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

Underground Tunnel
NAAC New Grading System Delay: नॅक मूल्यांकनात बदलाचा तिढा; मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडिंगला विलंब

शहरात जमिनीखालील रस्ते (भुयारी मार्ग) उभारण्यासाठी महापालिकेच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ‌‘पीएमआरडीए‌’मार्फत येरवडा ते कात्रजदरम्यान भुयारी रस्त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, सादर करण्यात आलेला हा आराखडा अपूर्ण आणि सर्वसमावेशक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, या प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पीएमआरडीएने तयार केलेल्या प्राथमिक आराखड्याचा आधार घेत, सुधारित आणि परिपूर्ण नियोजनासह भुयारी मार्ग प्रकल्पाची पुढील अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेला दिले आहेत.

Underground Tunnel
Leopard Attack: नारायणगाव हादरले; बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलगा जखमी

काय म्हणाले आयुक्त?

‌‘पीएमआरडीए‌’ने केलेल्या प्राथमिक विकास आराखड्यानुसार भुयारी मार्गाचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा स्वरूपाचे काम केलेल्या संस्थेची निवड करण्यात येईल. या कंपनीकडून तयार केल्या जाणाऱ्या फिजिबिलिटी रिपोर्टवरून पुढील निर्णय घेण्यात येईल. प्रकल्प मोठा असल्याने पीपीपी तत्त्वावर तो उभारावा लागणार आहे. याचाही विचार करण्यात येईल.

Underground Tunnel
Junnar Crime: आळेफाटा हादरवणारी घटना; निर्दयी बापाकडून मुलांचा खून, मुलीचा मृत्यू

...अशी असेल ‌‘एसपीव्ही‌’

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार लवकरच महापालिका एसपीव्ही स्थापन करेल. महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वा खालील या एसपीव्ही कंपनीमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त अशा विविध प्रशासकीय आस्थापना आणि वाहतूक तज्ज्ञांचादेखील समावेश करण्यात येईल.

...असे असणार भुयारी मार्ग

  • येरवडा येथील शास्त्रीनगर ते कोंढवा येथील खडीमशिन चौक

  • सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते औंध मार्गे जगताप डेअरीपर्यंत

  • खडकी येथून येरवडा येथील शास्त्रीनगर चौक

  • पु. ल. देशपांडे उद्यान ते शंकरशेठ रस्ता (सेव्हन लव्हज चौक)

  • हिंजवडी ते जगताप डेअरी ते बाणेर पाषाण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news