Women Bike Rally Pudhari
पुणे

Pudhari Women Bike Rally 2026: पुण्यात महिला भव्य बाईक रॅली; कधी, कुठे, सहभागी कसे होता येईल?

pudhari kasturi club pune womens bike rally 15 March 2026: रविवारी, १५ मार्च रोजी आयोजित रॅलीत शेकडो महिला सहभागी, प्रसिद्ध कलाकारांची भेटही उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

pudhari kasturi club pune womens bike rally how to participate

पुणे: रॅली महिला सक्षमीकरणाची, आत्मविश्वासाची, सन्मानाची अन्‌‍ आत्मनिर्भरतेची... असा महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करणाऱ्या आणि महिला शक्तीला सलाम करणाऱ्या माणिकचंद ऑक्सिरीच प्रायोजित दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. खास गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षानिमित्त ही बाईक रॅली रविवारी (दि. 15 मार्च) आयोजित करण्यात आली आहे आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रविवारी सकाळी सात वाजता सारसबागेजवळील मित्रमंडळ चौक येथील दै. ‌‘पुढारी‌’चे कार्यालय येथून रॅली निघणार आहे.

‌‘दै. पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने नेहमीच महिलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. महिलांना एक व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठीही कस्तुरी क्लब कार्यरत आहे. त्यापैकीच एक उपक्रम म्हणून दरवर्षी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी नववर्षानिमित्त महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले जाते. या रॅलीत दरवर्षी मोठ्या संख्येने महिला सहभागी होतात आणि बाईक चालवून महिला सक्षमीकरणाचा संदेश देतात. यंदाही मोठ्या उत्साहात रॅलीचे आयोजन केले असून, रविवारी (दि. 15) होणाऱ्या या रॅलीत शेकडो महिला सहभागी होणार आहेत.

‌‘रॅली महिलांच्या आत्मविश्वासाची, आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची‌’ अशी रॅलीची संकल्पना आहे. ढोल-ताशा, लेझीम आणि दांडपट्टा पथकांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असणार आहे. माणिकचंद ऑक्सिरीच हे रॅलीचे मुख्य प्रायोजक आहेत. तर, अदानी आणि ॲम्बोनिक फर्टिलिटी अँड आयव्हीएफ सेंटर हे रॅलीचे सहप्रयोजक आहेत. पॉवर्ड बाय क्रस्ना डायग्नोस्टिक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी (फायनान्स पार्टनर), सन मराठी (एंटरटेन्मेंट पार्टनर), ग्रँट मेडिकल फाउंडेशन, रुबी हॉल क्लिनिक (हेल्थ पार्टनर) आणि रुट स्किल्स (ग्रीन पार्टनर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रॅलीत कस्तुरी सदस्यांसह इतर महिलांनाही सहभागी होता येणार आहे. महिलांचे ग्रुप घेऊन येणाऱ्या ग््रुाप लीडरना ट्रॉफी देऊन रंगमंचावर सन्मानित करण्यात येईल. या बाईक रॅलीसाठी ड्रेस कोड असून, कोणत्याही रंगाची नऊवारी किंवा पांढरा कुर्ता आणि निळ्या रंगाची जीन्स किंवा लेगिन्स घालावी. या रॅलीसाठी महिलांना प्रवेश विनामूल्य आहे. बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकीला प्रशस्तिपत्र आणि येणाऱ्या प्रत्येकीला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

महिलांना मिळणार आकर्षक भेटवस्तू

रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. रॅलीचे ग्रीन पार्टनर असलेल्या रुट स्किल्सच्या संस्थापिका भाविशा बुद्धदेव आणि अर्चित एंटरप्रायजेसचे उमेश अंगरखे यांच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

अशी नावनोंदणी करा!

दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने आयोजित केलेल्या महिला भव्य बाईक रॅलीत कस्तुरी क्लब सदस्यांसह इतर महिलांनाही सहभागी होता येणार आहे. त्यासाठी पूर्वनावनोंदणी करणे आवश्यक आहे. बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नावनोंदणीसाठी येथे क्लिक करा

‌‘सन मराठी‌’ वाहिनीवरील कलाकारांना भेटण्याची संधी

दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने आयोजित महिला भव्य बाईक रॅलीत ‌‘सन मराठी‌’ वाहिनीवरील ‌‘हुकुमाची राणी ही‌’ या मालिकेतील कलाकारही सहभागी होणार आहेत. मालिकेत ‌‘इंद्रा‌’ची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय पाटील, ‌‘मालती‌’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिता पनवेलकर आणि ‌‘राणी‌’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वैभवी चव्हाण (राणी) हे सहभागी होतील आणि या कलाकारांना भेटण्याची संधी कस्तुरींना मिळणार आहे.

इथे करा संपर्क:

महिला भव्य बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 8888808027/ 7040848572 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

रॅली कधी: रविवार, दि. 15 मार्च 2026

वेळ: सकाळी सात वाजता

स्थळ: पुढारी ऑफिस, सारसबागेजवळ, मित्रमंडळ चौक, पुणे

...मग रॅलीत सहभागी व्हाच!

महिलांचा ग्रुप घेऊन येणाऱ्या ग्रुप लीडरना ट्रॉफी देऊन रंगमंचावर सन्मानित केले जाईल.

ड्रेस कोड: कोणत्याही रंगाची नऊवारी किंवा पांढरा कुर्ता आणि निळी जीन्स किंवा लेगिन्स.

प्रत्येकीला चहा-नाष्टा; नावनोंदणी आवश्यक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT