Pudhari Rise Up Women Athletics Pudhari
पुणे

Pudhari Rise Up Women Athletics Pune: पुण्यात ‘पुढारी राईज अप महिला ॲथलेटिक्स’ स्पर्धेत युवतींचा दमदार जलवा

धावणे, लांब उडी, उंच उडी आणि गोळाफेकमध्ये तरुण खेळाडूंनी पदकांची कमाई केली; आदिती हरगुडे, प्रांजल थोरात, केतकी कुंटे यांचा पहिला क्रमांक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कै. बाबूराव सणस मैदानावर सुरू असलेल्या ‌‘पुढारी राईज अप महिला ॲथलेटिक्स‌’ स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आणि वेगाने उपस्थितांची मने जिंकली. धावणे, गोळाफेक, लांब उडी आणि उंच उडी अशा विविध क्रीडाप्रकारांत मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पदकांची कमाई केली.

धावण्याच्या शर्यतीत 1000 मीटर प्रकाराच्या मुलींच्या गटात अदिती हरगुडे (बीजेएस वाघोली) हिने 3:16.7 अशी उत्कृष्ट वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, 15 वर्षांखालील मुलींच्या 1000 मीटर स्पर्धेत प्रांजल थोरात (सीटीएस आकुर्डी) 3:23.8 वेळेसह अव्वल ठरली.

सतरा वर्षांखालील 100 मीटर शर्यतीत केतकी कुंटे (जीपीपी पुणे) हिने 13.4 सेकंदांत अंतर कापत सुवर्णपदक मिळवले, तर पंधरा वर्षांखालील 80 मीटर प्रकारात भार्गवी देशमुख (अमृता विद्यालय) 10.4 सेकंदांसह पहिली आली. 13 वर्षांखालील 50 मीटर प्रकारात बतुल रेतीवाला (संस्कृती स्कूल) हिने 7.3 सेकंदांत शर्यत पूर्ण करत बाजी मारली.

सतरा वर्षांखालील गोळाफेक प्रकारात नेहा सक्सेना (पीसीएमसी स्कूल) हिने 7.45 मीटर लांब गोळा फेकून प्रथम स्थान मिळवले. 11 वर्षांखालील गटात भव्या दीक्षित (सेंट मेरीज) 6.29 मीटर कामगिरीसह विजेती ठरली. लांब उडीत अकरा वर्षांखालील गटात अन्वी शेळके (एस. बी. पाटील स्कूल) हिने 3.80 मीटर उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला. उंच उडीत तेरा वर्षांखालील अहिल्या साळुंखे हिने 1.35 मीटरची उंची गाठत सुवर्णपदकावर नाव कोरले. गोळाफेक प्रकारात 17 वर्षांखालील गटात नेहा सक्सेना हिने 7.45 मीटरसह स्पर्धेत सर्वांत लांब फेक केली. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून प्रमोद मोरे, विजय भास्कर, विजय ढमले आणि मनोज फुलपगारे यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरीच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकॅडमीक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत. सहप्रायोजक अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेन्टिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.

स्पर्धेचे निकाल (प्रथम क्रमांक) : 1000 मी. (मुली 17): अदिती हरगुडे (3:16.7), 1000 मी. (मुली 15): प्रांजल थोरात (3:23.8), 100 मी. (मुली 17): केतकी कुंटे (13.4 सेकंद), 80 मी. (मुली 15) : भार्गवी देशमुख (10.4 सेकंद), 50 मी. (मुली 13) : बतुल रेतीवाला (7.3 सेकंद), गोळाफेक ( ण-17): नेहा सक्सेना (7.45 मी.), गोळाफेक (मुली 11): भव्या दीक्षित (6.29 मी.), लांब उडी (मुली 11): अन्वी शेळके (3.80 मी.), उंच उडी (मुली 13) : अहिल्या साळुंखे (1.35 मी.).

सर्वांत कमी वेळ

50 मीटर धावण्यात बतुल रेतीवाला हिने 7.3 सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवली

अष्टपैलू कामगिरी

बतुल रेतीवाला हिने 50 मीटर धावण्यात प्रथम, तर उंच उडीत (1.26 मी) द्वितीय क्रमांक पटकावून आपली छाप पाडली.

पारितोषिक वितरणाला या मान्यवरांची उपस्थिती

‌‘पुढारी राईज अप महिलांच्या ॲथलेटिक‌’च्या दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण करण्यात आले. या पारितोषिक वितरणाला गलानी फॅशनचे मयूर गलानी, सोनम गलानी, उप शिक्षणाधिकारी सुनीता नाईक कुमावत, पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील, सायकॉलॉजीस्ट डॉ. अवंती धडफळे, एनएआर इंडियाच्या अध्यक्षा कीर्ती भोसले, आरटीओ अधिकारी वृंदा मारके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या डॉ. सुमन पांडे आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सदस्या उषा निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT