

Praphull Shivale Pune Zp Election 2026
पाबळ: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत पाबळ जिल्हा परिषद गटात एक अत्यंत भावूक प्रसंग पाहायला मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे पाबळ येथे दर्शनासाठी आगमन झाले असता, हजारोच्या संख्येने नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या अस्थी दर्शना नंतर आयोजित शोक सभेत उपस्थित नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले, ज्यामुळे संपूर्ण पाबळ परिसर शोकाकुल झाला होता.
हजारोचा जनसमुदाय आणि भावूक वातावरणात अजित पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी पाबळसह परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. 'अजित दादा अमर रहे'च्या घोषणांनी परिसर धिरगंभीर झाला होता. यानंतर झालेल्या शोक सभेत बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांना आठवणींना उजाळा देताना व्यासपीठावरच रडू कोसळले.
हे दृश्य पाहून सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांनाही आपले अश्रू रोखता आले नाहीत. दादांनी दिलेले हे अखेरचे शिलेदार असून त्यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार प्रफुल्ल शिवले आणि पाबळ गणातील उमेदवार वंदना पवार केंदूर गणातील सुचेता थिटे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले.
या वेळी बोलताना प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असताना दादांचा फोन आला व त्यांनी सांगितले तीनही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे.
हा दादांसोबत झालेले शेवटचा फोन होता यामुळे तीनही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आनणे हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेलं. या शोक सभेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने मोठी सहानुभूती निर्माण झाल्याचे चित्र आहे.