धायरी : पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिस यांच्या वतीने नवले पूल, वडगाव बुद्रुक येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा, रस्त्याने चालताना पद पथावरूनच चालावे, घाटात किंवा तीव्र उतारावर वाहन बंद करू नका, आपले जीवन अनमोल आहे, आपली सुरक्षा आपणच करा, असा संदेश या वेळी नागरिकांना व वाहनचालकांना देण्यात आला.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत राजे भोसले, सुजित डोंगरजाळ, भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, सचिन सावदेकर, मोटर वाहन निरीक्षक रहिमा मुल्ला, अभिजित गायकवाड, डॉ. दिपाली जमदाडे आदींनी रस्ते सुरक्षाविषयी या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी नागरिकांत वाहतूक नियमांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात आली. रस्त्यावरील सर्व वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्रीनिवास गायकवाड, विवेक पाटील, भरत गायकवाड, संतोष माने, सारंग राऊत, प्रज्वल चव्हाण, भागवत आगडे, सचिन गुंड आदींनी प्रयत्न केले.
हेही वाचा