चाकण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवून कंपनीचे नुकसान केले. याप्रकरणी एका कर्मचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 फेब्रुवारी 2015 ते 20 जून 2023 या कालावधीत चाकण एमआयडीसीमधील लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीत घडला. दिनेश ब्रिजलाल गौतम (वय 55, रा. रावेत, पुणे; मूळ रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेशकुमार सोहनलाल गुप्ता (वय 54) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीत कार्यकारी निर्देशक या पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीत आरोपी दिनेश गौतम हेदेखील काम करीत होते. त्यांच्याकडे कंपनीच्या व्यवसायासंबंधी गोपनीय माहिती कंपनीने विश्वासाने सोपवली होती. या माहितीचा गैरवापर करून गौतम यांनी गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला दिली. ज्यामुळे फिर्यादी यांच्या कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा