पुणे

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कार्यक्रम

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 64 वा वाढदिवस शनिवारी (दि. 22) साजरा होत आहे. अजित उत्सवांतर्गत बारामती शहर व तालुक्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. किमान 3 हजार बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील व युवक अध्यक्ष अविनाश बांदल यांनी सांगितले.

शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे अन्नदान, देसाई इस्टेट जिल्हा परिषद शाळेत खाऊवाटप व शालेय वस्तूंचे वाटप, पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक, दर्ग्यामध्ये चादर चढविणे, 'वृक्षमित्र' पुरस्कार वाटप, रुग्णांना फळे वाटप, अंगणवाडीत खाऊवाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप, दिव्यांगांना व्हीलचेअर व काठी वाटप, गरजू महिलांना साडी वाटप, 664 देशी झाडांचे रोपण आदी कार्यक्रम पार पडत आहेत.

शहराध्यक्ष जय पाटील व अविनाश बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश इंगुले, अभिजित काळे, साधू बल्लाळ, विशाल जाधव, पार्थ गालिंदे, बबलू जगताप, अजिनाथ चौधर, वैभव शिंदे, परवेज सय्यद, नवनाथ चौधर, ओंकार जाधव, आहित्य हिंगणे, अक्षय माने आदींकडून राष्ट्रवादी भवनासमोर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय नेत्रदान अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
महारक्तदान शिबिरासाठी पावसाचा अडथळा येऊ नये, यासाठी पत्रा टाकत भव्य मंडप उभा करण्यात आला आहे. रक्तदान शिबिरात यंदा उच्चांक केला जाणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT