बारामती : जिल्हा पोलिस दलातील 11 पोलिस निरीक्षकांच्या पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी बदल्या केल्या. पाच सहायक पोलिस निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या.(Latest Pune News)
बहुचर्चित बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांची वर्षभरातच बदली करण्यात आली आहे. बारामती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तेथे नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बुधवारी (दि. 8) रात्री उशिरा बदल्यांचे आदेश जारी केले. पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे (कोठून-कुठे) : कुमार रामचंद्र कदम (वडगाव मावळ ते सासवड), सचिन दत्तात्रय वांगडे (हवेली ते उरुळी कांचन), रवींद्र दत्तात्रय पाटील (कामशेत ते नियंत्रण कक्ष), सहायक पोलिस निरीक्षक महादेव चंद्रकांत शेलार (नारायणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा),
अभिजित सुभाष देशमुख (परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते वडगाव मावळ), वैशाली रावसाहेब पाटील (बारामती तालुका ते हवेली), शंकर मनोहर पाटील (उरुळी कांचन ते कामशेत), चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती वाहतूक शाखा ते बारामती तालुका), श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी (नियंत्रण कक्ष ते बारामती वाहतूक), ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी (सासवड ते नियंत्रण कक्ष),
सहायक पोलिस निरीक्षक नितीन हनुमंत खामगळ (वेल्हा ते नियंत्रण कक्ष), सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण महादेव सपांगे (यवत ते नारायणगाव), किशोर विठ्ठल शेवते (वाचक अपर पोलिस अधीक्षक, पुणे ते वेल्हा) आणि सहायक पोलिस निरीक्षक गजानन रतन चेके (वाचक उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती ते नियोजित पोलिस ठाणे निरा-नृसिंहपूर).