पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षात शहरामध्ये शांतता राहावी, यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सराईतांवर दंडुका उगारला आहे. डिसेंबर 2023 अखेरीस पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील 12 टोळ्यांमधील एकूण 60 आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत मागील वर्षभरात 51 संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण 357 आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई झाली आहे. ज्यामुळे मोका पॅटर्नचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.
आरोपींनी मागील काही वर्षांत अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने तसेच स्वत:चे गुन्हेगारी वर्चस्व, दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरात, शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे.
रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (28, रा. चौधरी पार्क, वाकड), आरोपी शुभम युवराज सरोदे (21, रा.नाणेकरवाडी, चाकण), आरोपी मोहम्मद ऊर्फ मम्या मेहबुब कोरबु (28, रा. आझाद चौक, ओटास्कीम, निगडी), आरोपी प्रकाश ऊर्फ डब्बल सुरेंद्र राम (30, रा. बौध्द नगर, पिंपरी), तसेच आरोपी आकाश ऊर्फ जिलब्या यादव गायकवाड (26, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड), आरोपी आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (19, रा. कमीला चाळ, खडकी).
आरोपी लखन ऊर्फ बबलू अवधुत शर्मा (19, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड), आरोपी अक्षय नंदकिशोर गवळी (28, रा. गवळी वाडा, खडकी), आरोपी आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (19, रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी), अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (25, रा. जुनी सांगवी), आरोपी मन्नु ऊर्फ अतिष बलदेव कोरी (21, रा. गोकुळधाम सोसायटी, घरकुल, चिखली), आरोपी आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (19, रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी) या सर्व टोळी प्रमुखांसह त्यांचे साथीदार यांच्यावर गंंभीर गुन्हे नोंद आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा