PMPML Pudhari
पुणे

PMPML Record Revenue: पीएमपीएमएलची विक्रमी कमाई; एकाच दिवसात अडीच कोटींचे उत्पन्न

१७६७ बस रस्त्यावर; तिकीट, पास आणि मोबाईल अ‍ॅपमधून मिळाले २ कोटी ५१ लाख १५ हजार रुपयांचे उत्पन्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपीने उत्पन्नाचा नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सोमवारी (दि.१७) रोजी एकाच दिवसात २ कोटी ५१ लाख १५ हजार ६४ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे आणि चालक, वाहक, डेपो प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांमुळे ही मोठी कामगिरी साध्य झाली असल्याची चर्चा पीएमपीच्या वर्तुळात रंगली आहे.

उत्पन्नाचा सविस्तर तपशील

  • तिकीट रोख उत्पन्न : १ कोटी ५९ लाख १६ हजार ४०३

  • पास विक्री : ५७ लाख ०२ हजार ७३०

  • मोबाईल ॲप : ३३ लाख ५० हजार ९३१

  • पुणे दर्शन व पर्यटन : १ लाख ४५ हजार

दिवसात १७६७ बस धावल्या मार्गावर

सोमवारी पीएमपीच्या स्व:मालकीच्या ५२४ आणि कंत्राटदारांच्या १२४३ अशा एकूण १, ७६७ बस रस्त्यावर धावत होत्या. उपलब्ध ताफ्याचा प्रभावी वापर करून प्रवाशांना जलद सेवा देण्यावर भर देण्यात आला.

गेल्या काही महिन्यांपासून आम्ही डेपो मॅनेजर यांच्या सातत्याने बैठका घेत, त्यांना प्रशिक्षण देत आहे. याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून कमी उत्पन्न देणाऱ्या प्रत्येक बसवर बारीक लक्ष दिले जात आहे. याशिवाय अत्याधुनिक सॉक्फ्टवेअर प्रणालीद्वारे बसगाड्यांच्या संचलनाचा सखोल अभ्यास सुरू करण्यात आला आहे. तसेच, मार्गांवरील गळती रोखण्याचे देखील काम सुरू आहे. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे एकाच दिवसात अडीच कोटी उत्पन्न मिळाले आहे. असेच कामकाम यापुढे आम्ही सुरू ठेवणार आहे.
महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT